एक्स्प्लोर

Malegaon karkhana Election result: अरे सांगवीला सांगा, माळेगावला सांगा, एकच वादा अजितदादा; माळेगाव कारखान्याच्या निकालानंतर जोरदार सेलिब्रेशन

malegaon sahakari sakhar karkhana Election result: माळेगावच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनेलला मोठं यश, 21 पैकी किती जागांवर विजय मिळाला, जाणून घ्या एका क्लिकवर.

Malegaon sugar factory election result 2025: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे अजित पवारांच्या Ajit Pawar) समर्थनक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत रस्त्यावर एकच जल्लोष सुरु केला आहे. सध्या निळकंठेश्वर पॅनलच्या (NilKantheshwar Panel) समर्थकांकडून जोरदार घोषणबाजीला सुरुवात झाली आहे. 'अरे सांगवीला सांगा, माळेगावला सांगा, चेअरमन आमचा अजितदादा.... अरे एकच वादा, अजितदादा... आला रे आला दादाच आला', अशा घोषणांनी माळेगाव कारखान्याचा परिसर दणाणून गेला आहे.  (Malegaon Election Results 2025)

अजित पवार हे स्वत: माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी बारामतीत ठाण मांडून या निवडणुकीसाठी प्रचार केला होता. तसेच अजितदादांनी माळेगाव साखर कारखान्यासाठी 500 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. याचा अपेक्षित परिणाम मतदारांवर झालेला दिसत आहे. आज मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलची सरशी होताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनल यांच्यासमोर शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांची पॅनेल्स रिंगणात होती. मात्र, अजित पवार यांच्या पॅनेलला एकहाती सत्ता मिळण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या अजित पवार यांच्या पॅनलचे तीन उमेदवार विजय घोषित करण्यात आले आहेत. तर उर्वरित जागांवरही बहुतांश ठिकाणी अजित पवार यांच्याच पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे निळकंठेश्वर पॅनेलला सहजपणे बहुमत मिळेल, असा अंदाज आहे. 

Ajit Pawar: माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोणाकोणाचा विजय?

मंगळवारी मतमोजणीच्या पहिल्या दिवशी ब प्रवर्गातून अजित पवार विजयी झाले होते. त्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासून मतमोजणीला पुन्हा सुरुवात झाली होती. यावेळी अजित पवार यांचे दोन उमेदवार विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार रतन कुमार साहेबराव भोसले विजयी झाले आहेत . तावरे गटाचे बापूराव आप्पा गायकवाड पराभूत झाले आहेत. रतन कुमार साहेबराव भोसले यांनी 1487 मतांनी बापूराव आप्पा गायकवाड यांचा पराभव केला. 

इतर मागासवर्गीय प्रवर्गातून  अजित पवारांच्या पॅनलचे नितीन शेंडे 8494 मतं मिळवून विजयी झाले. त्यांनी सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे यांचा 1153 मतांनी पराभव केला. त्यांना 7341 मतं मिळाली. त्यामुळे आतापर्यंत अजित पवार यांच्या पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

माळेगाव कारखान्याच्या मतमोजणीत तावरेंच्या पॅनलला मोठा धक्का, अजित पवारांचा आणखी एक उमेदवार विजयी

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

केमिकल कारखान्यातील भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले; गेटला कुलूप लावून अवैध फटाक्यांची निर्मिती; बचाव पथकाने अवयवांचे तुकडे गोळा करून प्लास्टिक पिशवीत भरले
केमिकल कारखान्यातील भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले; गेटला कुलूप लावून अवैध फटाक्यांची निर्मिती; बचाव पथकाने अवयवांचे तुकडे गोळा करून प्लास्टिक पिशवीत भरले
Thane Crime : जास्त भाड्याचं आमिष दाखवून वाहने घ्यायचा अन् ती पैशासाठी गहाण ठेवायचा, ठाण्यात आरोपीकडून 32 गाड्या ताब्यात
जास्त भाड्याचं आमिष दाखवून वाहने घ्यायचा अन् ती पैशासाठी गहाण ठेवायचा, ठाण्यात आरोपीकडून 32 गाड्या ताब्यात
Bhogawati Sakhar karkhana: भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी; एकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, कारखाना कार्यालयाच्या काचाही फोडल्या
भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी; एकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, कारखाना कार्यालयाच्या काचाही फोडल्या
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केमिकल कारखान्यातील भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले; गेटला कुलूप लावून अवैध फटाक्यांची निर्मिती; बचाव पथकाने अवयवांचे तुकडे गोळा करून प्लास्टिक पिशवीत भरले
केमिकल कारखान्यातील भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले; गेटला कुलूप लावून अवैध फटाक्यांची निर्मिती; बचाव पथकाने अवयवांचे तुकडे गोळा करून प्लास्टिक पिशवीत भरले
Thane Crime : जास्त भाड्याचं आमिष दाखवून वाहने घ्यायचा अन् ती पैशासाठी गहाण ठेवायचा, ठाण्यात आरोपीकडून 32 गाड्या ताब्यात
जास्त भाड्याचं आमिष दाखवून वाहने घ्यायचा अन् ती पैशासाठी गहाण ठेवायचा, ठाण्यात आरोपीकडून 32 गाड्या ताब्यात
Bhogawati Sakhar karkhana: भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी; एकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, कारखाना कार्यालयाच्या काचाही फोडल्या
भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी; एकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, कारखाना कार्यालयाच्या काचाही फोडल्या
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन
Ola Stock Crash : वाहनांची विक्री घटली, उत्पन्न घटलं, तोटा 487 कोटींवर, ओलाचा स्टॉक क्रॅश, शेअरमध्ये घसरण सुरुच, अखेर तज्ज्ञ म्हणाले...
Ola Stock Crash : वाहनांची विक्री घटली, उत्पन्न घटलं, तोटा 487 कोटींवर, ओलाचा स्टॉक क्रॅश
अभिनेता राजपाल यादवला अंतरिम जामीन; महत्वाची एक अट पूर्ण केल्यानंतर भाच्चीच्या लग्नासाठी सोडलं
अभिनेता राजपाल यादवला अंतरिम जामीन; महत्वाची एक अट पूर्ण केल्यानंतर भाच्चीच्या लग्नासाठी सोडलं
ठाणे महापालिका आवारात 'दिवसाच खेळ चाले'; कारमध्ये दारू अन् चकना, पोलीस येताच धावाधाव, एकास पकडले
ठाणे महापालिका आवारात 'दिवसाच खेळ चाले'; कारमध्ये दारू अन् चकना, पोलीस येताच धावाधाव, एकास पकडले
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
Embed widget