एक्स्प्लोर

Mahayuti Seat Sharing : भाजप अन् राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंवर कुरघोडी, नाशिक, ठाणे आणि सातारच्या जागेवरुन दबाव तंत्राचा वापर सुरू?

Mahayuti Seat Sharing : महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचे पाहायला मिळत आहे.

Mahayuti Seat Sharing : महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये अद्याप ठाणे, नाशिक, सातारा या जागांवरून एकमेकांवर दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेली ठाण्याची जागा आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकची (Nashik) जागा मागण्यात आली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या जागा ह्या सध्या शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे शिवसेनेने या दोन्ही जागांवरचा आपला क्लेम सोडण्यास नकार दिला आहे.  नाशिक आणि ठाण्याच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीचे एकनाथ शिंदे यांच्यावर दबावतंत्र सुरु असल्याचे बोलले जात आहे. 

नाशिकच्या जागेवरुन राष्ट्रवादी अन् शिवसेनेत संघर्ष 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर नाशिकची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल , असं सांगण्यात येतं होतं. मात्र एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची जागा शिवसेना लढवणार आणि हेमंत गोडसे या ठिकाणाहून उमेदवार असणार अशी घोषणा अगोदरच केल्याने युतीमध्ये नाराजी निर्माण झाली होती. दुसरीकडे शिवसेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील कोणतेही परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादीला द्यायचे नाही, अशीच भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. 

नाशिकच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छगन भुजबळ उमेदवारी घेत लढण्याची  शक्यता आहे.  मात्र जवळपास अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीला पंधरा दिवस उलटून देखील अद्याप याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे ठाण्यातून देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दबावाला बळी न पडता ठाण्याची जागा भाजपला द्यायला नकार दिला आहे. एकीकडे जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातारची जागा भाजपला सोडायची तयारी दर्शवली आहे. याबदल्यात नाशिक लोकसभेची जागा मिळावी अशी मागणी केली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिकच्या जागेचा आश्वासन मिळवून देखील उमेदवार जाहीर करायची परमिशन न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. 

नाशिक , ठाणे,  सातारचा तिढा सुटेना 

जर आश्वासन मिळुन देखील जर नाशिकची जागा मिळत नसेल तर सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे इच्छुक उमेदवार असून या ठिकाणाहून आम्ही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांची उमेदवारी जाहीर करू अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अद्याप ना सातारचा उमेदवार जाहीर झालाय ना नाशिकचे उमेदवार जाहीर झालाय ना ठाण्याचा उमेदवार जाहीर होऊ शकला आहे.  एकंदरीतच महायुतीमध्ये एकमेकांबाबत दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Ajit Pawar : साहेबांना आणि मुलीला मतदान केलं, आता सुनेला मतदान करण्याची वेळ; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुलीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget