Tushar Gandhi on RSS : राष्ट्रीय स्वंयसेवक संघ विष आहे, त्यांच्याकडून देशाचा आत्मा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु; तुषार गांधींच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक
Tushar Gandhi on RSS : राष्ट्रीय स्वंयसेवक संघ विष आहे, त्यांच्याकडून देशाचा आत्मा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरुय; तुषार गांधींच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक

Tushar Gandhi comment on RSS : केरळच्या तिरुअनंतपुरममधील एका कार्यक्रमात बोलताना महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झालाय. राष्ट्रीय स्वंयसेवक विष आहे, त्यांच्याकून देशाभरात द्वेषाचा कॅन्सर पसरवला जात असल्याचं तुषार गांधी यांनी म्हटलं होतं. यानंतर आरएसएसच्या स्वयंसेवकांनी तुषार गांधींच्या वक्तव्याचा निषेध केलाय. दुसरीकडे भाजप देखील त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.
तुषार गांधी यांनी केरळच्या तिरुअनंतपुरममधील नेय्याट्टिनकारा येथे गांधीवादी नेते गोपीनाथन नायर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशाचा आत्मा सध्या कॅन्सरने पीडित आहे आणि हा कॅन्सर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पसरवत आहे. दरम्यान, तुषार गांधींच्या या वक्तव्यानंतर देशातील संघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलंय. तुषार गांधी यांनी माफी मागावी, असंही आंदोलक म्हणत आहेत. मात्र, तुषार गांधी यांनी कोणाचाही माफी मागणार नाही आणि वक्तव्या मागे देखील घेणार नसल्याचे स्पष्ट केलंय.
'महात्मा गांधी की जय', तुषार गांधी यांची घोषणाबाजी
तुषार गांधी यांच्या वक्तव्यानंतर एकीकडे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. मात्र, तुषार गांधी त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांनी 'महात्मा गांधी की जय' म्हणत घोषणा दिलेल्याही पाहायला मिळाल्या. यावेळी आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली होती. मात्र, तरिही तुषार गांधी 'गांधी अमर रहें' आणि 'आरएसएस मुर्दाबाद', अशा घोषणा देत राहिले.
केरळ काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या निषेधाबाबत केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन यांनी भाजप-आरएसएस तसेच केरळमधील डाव्यांच्या सरकारवर निशाणा साधला. सुधाकरन म्हणाले की, भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांच्या या कृत्यामुळे धर्मनिरपेक्ष केरळचा अपमान झाला आहे. गोडसेचे भूत भाजप आणि आरएसएसला सतावत आहे. गांधीजींची आणि धर्माची खिल्ली उडवताना गोडसेचा गौरव करणाऱ्यांना केरळच्या धर्मनिरपेक्ष भूमीत स्थान नाही.
धर्मनिरपेक्ष, लोकतंत्र के लिए खतरा : सुधाकरण
केरल कांग्रेस अध्यक्ष सुधाकरण म्हणाले, संघ परिवाराने देशाच्या आत्म्याला कॅन्सरचा संसर्ग केला आहे, असे म्हणण्यात गैर ते काय? ते धर्मनिरपेक्ष मूल्ये, लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी धोकादायक आहेत. आरएसएस आणि भाजपच्या समर्थकांनी जे केले तो गांधींचा अपमान आहे. गांधीजींच्या नातवालाही न सोडणारा भाजप फॅसिस्ट आहे की नाही, हे सीपीएमने तरी स्पष्ट करावे. धर्मनिरपेक्ष केरळ या कृत्याला माफ करणार नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
