एक्स्प्लोर

बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांचं थोबाड फोडलं, अरविंद सावंतांच्या 'त्या' टीकेवरुन शंभुराज देसाईंचा हल्लाबोल

खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शायना एनसी (Shaina NC) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन चांगलच वादंग निर्माण झालंय. यावरुन मंत्री शंभुराज देसाई यांनी सावंत यांच्यावर टीका केलीय.  

Shambhuraj Desai on Arvind Sawant : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शायना एनसी (Shaina NC) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन चांगलच वादंग निर्माण झालं आहे. याच मुद्यावरुन मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी अरविदं सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांचं थोबाड फोडलं असतं, अशी टीका सावंत यांनी केलीय. महिलांबाबत अर्वाच्य, लांचनास्पद, अपमानास्पद बोलणं अत्यंत दुर्दैवी आहे. अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याला राज्यातील महिला नक्कीच उत्तर देतील अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे .

नेमकं काय म्हणाले होते अरविंद सावंत?

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी शिवसेना नेत्या शाइन एनसी यांच्यावर निशाणा साधला आणि सांगितले की, त्यांची अवस्था बघा, त्या आयुष्यभर भाजपमध्ये राहिल्या आता दुसऱ्या पार्टीत गेल्या आहेत. इथं 'इम्पोर्टेड माल'  चालत नाही, फक्त ओरिजनल माल येथे चालतो. त्यांच्या वक्तव्यावर मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी पलटवार करत माफी मागण्याची मागणी केली. "ते स्त्रीचा आदर करू शकत नाहीत," असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपने देखील अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती.

अरविंद सांवत यांच्याकडून जाहीर दिलगिरी

मी महिलांचा कधीही अपमान केला नाही आणि करणारही नाही. माझ्या वक्तव्यामुळं जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलं. 29 तारखेला मी जे काही बोललो आहे, त्यानंतर 1 तारखेला अनेक भगिनी या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि माझ्या वर गुन्हा दाखल झाल्याचे सावंत म्हणाले. अरविंद सावंत यांनी शायना एनसी (Shaina NC) यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केलं होतं. याबाबत त्यांनी माफी मागितली आहे. 

 शरद पवारांनी तक्रार केल्यास चौकशी केली जाईल 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या टीकेला देखील देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं. सत्ताधारी गटाच्या उमेदवारांना पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीतून रसद पुरवली जात असल्याचं वक्तव्य देसाई यांनी केलं होते. याबाबत बोलताना शंभुराज देसाई यांनी शरद पवारांनी तक्रार केल्यास चौकशी केली जाईल असे म्हटले आहे. 

महत्वाच्या बातम्या:

अरविंद सांवत यांच्याकडून जाहीर दिलगिरी, माल शब्दावरुन शायना एनसी यांच्या तक्रारीनंतर एक पाऊल मागे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेलAjit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोललेNana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही,  गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget