फ्लेक्सवरुन सोनिया गांधी-राहुल गांधी गायब, कुठे निघालेत ? आमच्याकडे हाऊसफूल , विखेंचा हल्लाबोल
Maharashtra Politics : आता तर त्यांच्या फ्लेक्सवरून सोनिया व राहुल गांधी देखील गायब झाल्याचे दिसून येत आहे. कोणत्या दिशेला चालले हे समजत नाही, आमच्याकडे तर हाउसफुल झालंय. खासदार लोखंडे यांच्या पक्षात जात असतील तर त्यांनाच माहीत.
Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat : काँग्रेस विरोधात काम करणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्लाबोल केला. ते संगमनेरमध्ये बोलत होते. ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये. कोणत्या पक्षनिष्ठेच्या तुम्ही गप्पा मारता. असा टोला देखील विखे पाटील यांनी नाव न घेता थोरात यांना भाषणातून लगावला.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरू असतात. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी संगमनेर शहरात विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये. कोणत्या पक्षनिष्ठेच्या तुम्ही गप्पा मारता. असा टोला देखील विखे पाटील यांनी नाव न घेता थोरात यांना भाषणातून लगावलाय...
फ्लेक्सवरुन सोनिया गांधी-राहुल गांधी गायब, कुठे निघालेत ?
सांगमनेर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या वर्षात या शहरात साधं स्मारक देखील उभे राहू शकलं नाही. आता तर त्यांच्या फ्लेक्सवरून सोनिया व राहुल गांधी देखील गायब झाल्याचे दिसून येत आहे. कोणत्या दिशेला चालले हे समजत नाही, आमच्याकडे तर हाउसफुल झालंय. खासदार लोखंडे यांच्या पक्षात जात असतील तर त्यांनाच माहीत. आमच्यावर पक्ष बदलण्याची टीका काँग्रेसचे मित्र करतात. पण आम्ही जे करतो ते डंके की चोट पर जाहीरपणे करतो. बाळासाहेब विखे काँग्रेसकडून खासदार म्हणून उभे असताना तुम्ही तुमच्या मेहुण्याच्या कम्युनिस्ट पक्षाचे काम केलं. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शकुंतला थोरात यांच्या विरोधात उमेदवारी करत घोडा चिन्ह घेतलं व तुम्ही काँग्रेसलाच घोडा लावला, असे विखे पाटील म्हणाले.
कोणत्या पक्षनिष्ठेच्या तुम्ही गप्पा मारता -
तुमचा मेव्हणा ( डॉ. सुधीर तांबे ) नाशिक पदवीधर मध्ये उभा राहिला, त्यावेळी काँग्रेसच्या विरोधात त्यांना अपक्ष म्हणून निवडून आणलं. हे सगळ चालत अंधारात. यावेळी भाचे ( सत्यजित तांबे ) निवडणुकीत उभे राहिले आम्ही त्यांना निवडून आणलं. तुमचा महाविकास आघाडीचा उमेदवार होता तेव्हा तुम्ही हात बांधून बसले होते.. हात बांधले होते, तोंड नव्हतं बांधला ना ? त्यावेळी मी काँग्रेसचा निष्ठावान सैनिक आहे, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत द्या हे का नाही सांगितलं ? कोणत्या पक्षनिष्ठेच्या तुम्ही गप्पा मारता. तुम्ही रात्री कोणाचे पाय धरता मला विचारा . तुम्हाला खासगीत सांगेल. आपल्या दिव्याखाली अंधार असेल तर दुसऱ्यांच्या पंचाइत करायचं बंद करा असं माझं मत आहे, असे विखे पाटील म्हणाले.