(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics : निष्ठा युवकांची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची! मविआ युवा आघाडी ॲक्टिव्ह मोडवर, युवा नेत्यांचा 6 मार्चला मुंबईत मेळावा
Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मविआच्या युथ आघाडीकडून ठिकठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत. मुंबईत 6 मार्चला युवा नेत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
Maha Vikas Aghadi News : आगामी लोकसभेआधी (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीचे (MVA) युवा नेते ॲक्टिव्ह मोडवर आहत. ठाकरे गट, काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते मैदानात उतरणार आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मविआच्या युथ आघाडीकडून ठिकठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत. महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांचा 6 मार्चला मुंबईत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मविआ युवा आघाडी ॲक्टिव्ह मोडवर
महाविकास आघाडीची युवा आघाडी आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मैदानात उतरली आहे. महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांचा 6 मार्चला मुंबईत युवा महाराष्ट्रभिमान मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
ठाकरे गट, काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते मैदानात
महाविकास आघाडीतील काँग्रेसची युवक काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाची युवासेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत.
निष्ठा युवकांची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर युवा आघाडीकडून ठिकठिकाणी सभा होणार आहेत. त्यामधील पहिल्या मेळाव्याचं आयोजन 6 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान येथे आयोजित करण्यात आला आहे. 'निष्ठा युवकांची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची...!' म्हणत या तिन्ही पक्षांच्या युवा संघटना राज्यभरात युवकांच्या प्रश्नाला वाचा फोडणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून रणनिती ठरवणार
मागील आठवड्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, शिवसेना ठाकरे गटाचे सचिव वरून सरदेसाई आणि युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत या युवा नेत्यांची बैठक होऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
निष्ठा युवकांची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची...! युवा महाराष्ट्राभिमान मेळावा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या युवक मेळाव्याला सर्व निष्ठावंत प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष यांनी उपस्थित रहावे, असं आवाहन सोशल मीडियावर पोस्टद्वारे करण्यात आलं आहे. या मेळावा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 6 मार्च 2024 रोजी दुपारी 2 वाजता पार पडणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :