(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपा शरद पवारांना पॉवरफुल धक्का देणार? पश्चिम महाराष्ट्रातील विश्वासू नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचालींना वेग
Maharashtra Politics : मराठवाड्यानंतर भाजपनं (BJP) आता पश्चिम महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यामुळे भाजपची मराठवाड्यातील ताकद वाढली आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातही ताकद वाढवण्यासाठी भाजपनं राजकीय हालचाली सुरु केल्या आहेत.
Maharashtra Politics : मराठवाड्यानंतर भाजपनं (BJP) आता पश्चिम महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यामुळे भाजपची मराठवाड्यातील ताकद वाढली आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातही ताकद वाढवण्यासाठी भाजपनं राजकीय हालचाली सुरु केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शऱद पवार) पक्षातील एक बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्याचं समजतेय. पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांचा (Sharad Pawar) विश्वासून नेता लवकरच पक्षप्रवेश करेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवढणुकीपूर्वी भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला धक्के देण्याची रणनिती आखली आहे. लोकसभेला 42 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या असतील, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्वाचे आणि ताकदीचे नेते आणले पाहिजेत तरच हे शक्य होईल, असी या रणनीतीमागील भूमिका असल्याचं समजतेय.
मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष -
अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची मराठवाड्यातील ताकद वाढली आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन मतदारसंघाला फायदा होईल. मराठवाड्यानंतर भाजपनं पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्र हा पहिल्यापासून गड राहिलाय.येथे शरद पवारांची ताकद सर्वाधिक आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये भाजपनं या भागात चांगला शिरकाव केला, पण हवी तशी पकड त्यांना मिळवता आली नाही. त्यामुले आता भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात लक्ष घातलेय. शरद पवारांचा विश्वासू नेता त्यांच्या गळाला लागल्याचं समजतेय. शरद पवार यांच्यासोबत असणारा पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेत्याला घेण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्याचं समजतेय.
कोणता नेता भाजपात जाणार ??
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तो नेता शरद पवार यांच्यासोबत उभा राहिला. शरद पवारांसोबत असलेल्या या नेत्याला पक्षात आणले तर सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये ताकद वाढेल, असं भाजपचं समीकरण आहे. त्या नेत्याकडे प्रशासकीय अनुभवही मोठा आहे, त्यानं मंत्रिमंडळात महत्वाची खाती संभाळली आहेत. शरद पवारांसोबत असलेल्या या नेत्याची दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा झाल्याचेही समोर आलेय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याला भाजपमध्ये आणल्यास पश्चिम महाराष्ट्रातील ताकद वाढेलच. त्या नेत्याच्या मुलाला लोकसभेची उममेदवारी दिली जाऊ शकते. किंवा त्याच नेत्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवायचं का? यावर चर्चा सुरु असल्याचं समजतेय. राष्ट्रवादी काँग्रेस अभेद्य असताना त्या नेत्याचं अजित पावरांशी सख्य नव्हते,पण शरद पवारांचे विश्वासू असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं महत्व होतं. आता त्याच शरद पवाराच्या विश्वासू नेत्याला पक्षात घेऊन भाजप आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.
जयंत पाटलांचं स्पष्टीकरण -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षातील बड्या नेत्या बाबत येणाऱ्या बातम्या केवळ अफवा असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'एबीपी माझा'ला माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एकसंघ असून येत्या दोन-तीन दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय पूर्ण होणार असल्याचेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केवळ विरोधकांबाबत संभ्रम करण्याचा प्रयत्न असल्याची पाटील यांची सत्ताधारी गटावर टीका