Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं बंड, किशोरी पेडणेकर भावूक
Maharashtra Political Crisis : राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारी घटना आज घडली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडाचं हत्यार उपसलं आहे.
Maharashtra Political Crisis : राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारी घटना आज घडली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडाचं हत्यार उपसलं आहे. शिंदे यांनी शिवसेनेचे 35 आमदार फोडल्याची माहिती आहे. त्यांच्या या बंडामुळे शिवसेनेत मोठे भगदाड पडले आहे. अशातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यावर आपली प्रतिक्रिया देताना भावूक झाल्या आहेत. यावर आपली प्रतिक्रिया देताना पेडणेकर म्हणाल्या की, प्रत्येक 10 वर्षाला शिवसेनेला या गोष्टीना सामोरे जावं लागत आहे. त्या वेदना आम्हाला आत्मक्लेश होत असल्याचं त्या म्हणाल्या. शिंदेंच्या बंडावर आपली प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ''संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोरोना काळात ज्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक झालं, संयमी, नेतृत्व, शांत. बाळासाहेब असतानाही जे नेते सेनेतून बाहेर पडले, तेव्हाही हेच आरोप होते. आता ते बाहेर जाणार की नाही हे मला माहित नाही. मात्र कालपासून ज्या पद्धतीने मेलोड्रामा सुरु आहे, तो आम्हाला सैनिकांना आत्मक्लेश देणारा आहे. दरवेळेला आम्हाला आनंद झाला तरी आम्ही तो बाळासाहेबांकडे येऊन शेअर करतो, दुःख झालं तरी त्यांच्याकडे येऊन शेअर करतो.''
शिंदे यांना काहीही सांगण्या इतकी मी मोठी नाही: पेडणेकर
एकनाथ शिंदे यांना तुम्ही काय आवाहन कराल, असं माध्यमांनी किशोरी पेडणेकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, ''एकनाथ शिंदे यांना काहीही सांगण्या इतकी मी मोठी नाही. पण निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विनंती करेल की, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाकडून गाजर दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, त्याला बळी पडू नका. आपल्या घरी परत या.''
संबंधित बातम्या:
Eknath Shinde : मिलिंद नार्वेकर गुजरातला पोहोचताच थेट मातोश्रीवर रश्मी ठाकरेंना फोनाफोनी! एकनाथ शिंदे फोनवरून काय म्हणाले?
Sanjay Raut : शिवसेनेच्या दोन आमदारांना भाजपकडून मारहाण, किडनॅप करुन गुजरातला नेलं: संजय राऊत यांचा गंभीर आरोप