(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Political Crisis: शिंदे गटाकडून पर्यायांची चाचपणी सुरू, विलीन करण्याची वेळ आल्यास मनसेचाही पर्याय?
Maharashtra Political Crisis: शिवसेनेतून बंड करून पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची टांगती तलवार आहे.
Maharashtra Political Crisis: शिवसेनेतून बंड करून पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांवर अपात्रतेच्या कारवाई होण्याची टांगती तलवार आहे. यापासून वाचण्यासाठी शिंदे गटाला इतर पक्षात विलीन व्हावे लागणार आहे. यात आधी भाजप आणि प्रहार या दोन पक्षांचा पर्याय त्यांच्या समोर होता. आता त्यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचा पर्याय देखील असल्याचं सांगितलं जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून पर्यायांची चाचपणी सुरू आहे. जर शिंदे गट विलीन करण्याची वेळ आल्यास मनसेमध्येही हा गट सामील होऊ शकतो. विलीनीकरणासाठी शिंदे गट मनसेकडे प्रमुख पर्याय म्हणून बघत असल्याचं सांगण्यात येत आहेत. यामागचं कारण सांगितलं जात आहे की, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी वारंवार सागितलं आहे की, ते हिंदुत्वासाठी वेगळे होते आहेत. त्यांचं हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे. यातच अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली आहे, ती बाळासाहेब ठाकरेंच्या पद्धतीची आहे. यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनसे ही ऑफर स्वीकारू शकते का?
याबाबत मनसेमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेकडे असा कोणताही पर्याय आल्यास, मनसे ही ऑफर स्वीकारेल. तसेच शिंदे गटाचे मनसेत विलानीकरण होऊ शकतं. याआधी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या एकमेव आमदाराचे मत भाजपकडे गेले होते. याचे कारण म्हणजे हे दोन्ही पक्ष समविचारी आहेत. त्यामुळे मनसे आमदाराने भाजप उमेदवारांना आपलं मत दिलं. अशातच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो, अशी चर्चा आहे. तसेच मनसेचे काही नेते आणि शिंदे गटातील काही प्रमुख आमदारांची याविषयी चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या हालचालींना वेग येईल, असंही सांगण्यात येत आहे.
संबंधित बातमी:
महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाचा खेळ आता सुप्रीम कोर्टात, अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाकडून याचिका