एक्स्प्लोर

Chandrakant Khaire : राज्यातील हिंसाचाराच्या घटना म्हणजे, भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

Chandrakant Khaire : राज्यातील घडणाऱ्या या घटना पाहता भाजपचं हा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. 

Chandrakant Khaire On BJP : गेल्या काही दिवसांत राज्यभरात ठिकठिकाणी दोन गटात होणाऱ्या वादामुळे हिंसाचाराच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरपासून (Chhatrapati Sambhaji Nagar) सुरु झालेल्या वादाचे लोण आता राज्यभरात पसरले आहे. दरम्यान अकोल्यातील हरिहरपेठ भागात शनिवारी दोन गटात झालेल्या वादानंतर या भागात संचारबंदी लावण्यात आलीये. तर काल अहमदनगरमधील शेवगावातही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे राज्यातील घडणाऱ्या या घटना पाहता भाजपचं हा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. 

दरम्यान यावर बोलताना खैरे म्हणाले आहे की, लोकसभा निवडणुकीत मतदार महाविकास आघाडीलाच पसंती देणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात कुठेच जातीय तेढ निर्माण होऊ दिली नाही. पण आता छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि शेवगावमध्ये दोन गटात वाद झाला. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांच्या काळात हे सर्वकाही घडत आहे. हिंदू आणि मुस्लीम यांना वेगळ करण्यासाठी यांच्याकडून राजकारण सुरु आहे. मुस्लीम समाज महाविकास आघाडीच्या बाजूने उभं असल्याने असे प्रकार घडवले जात आहे. त्यामुळे दोन गटात होणारे वाद घडवले जात आहे. मुस्लीम मतदान उद्धव ठाकरे यांना मिळू नयेत म्हणून हा सर्व प्रकार सुरु आहे. तर हा सर्व घटना म्हणजेच भाजपचं लोकसभा निवडणुकीचा प्लॅन असल्याचं चंद्रकांत खैरे म्हटले आहे. 

जलील यांना भाजपनेचं उपोषणाला बसवले...

दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दोन गटातील वादाला देखील भाजपच जबाबदार असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. शहराच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी 17 दिवस उपोषण करण्यात आले. हे उपोषण करण्यासाठी जलील यांना भाजपच्या लोकांनी बसवले होते. त्याच काळात नामांतराच्या विरोधात काही मुस्लीम लोकं तयार झाले. यामुळे एक वातावरण तयार करण्यात आल्याचं देखील खैरे म्हणाले. 

जनता लोकसभेत महाविकास आघाडीलाच मतदान करणार...

भाजपच्या खासदारांना 30 मे 30 जूनपर्यंत आपल्या मतदारसंघात राहून कामे करण्याच्या सूचना मिळाल्या असून, भाजप लोकसभेच्या तयारीला लागले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर बोलताना खैरे म्हणाले की, भाजपला कर्नाटकात मिळालेल्या अपयशामुळे ते कामाला लागले आहेत. त्यांना लोकसभा हवी आहेत. पण असे असलं तरीही राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला एकमत करायचं ठरवले आहे. तर आगामी मुख्यमंत्री देखील उद्धव ठाकरे होनरा असल्याचं खैरे म्हणाले.  

इतर महत्वाच्या बातम्या : 

राज्यातील सर्व भाजप खासदारांना 30 जूनपर्यंत मतदारसंघात राहण्याच्या सूचना; कर्नाटकातील दारुण पराभवानंतर निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
Embed widget