महायुतीचे 9, महाविकास आघाडीचे 5 उमेदवार अजूनही गुलदस्त्यात, कोणत्या जागेवर उमेदवार कोण?
Maharashtra Lok Sabha Candidates : राज्यात अद्यापही काही ठिकाणचे उमेदवार निश्चित न झाल्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही संभ्रम असल्याचं दिसतंय.

मुंबई: राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार जरी सुरू झाला असला तरी दोन्ही आघाड्यांचा काही जागांवरचा पेच कायम आहे. महायुतीकडून (Mahayuti Seat Sharing) अद्याप नऊ जागांवर उमेदवार देण्यात आलेला नाही, तर महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) पाच जागांवरील उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम असल्याचं दिसतंय.
महायुतीच्या जाहीर न झालेल्या जागा
- मुंबई उत्तर-मध्य
- मुंबई उत्तर-पश्चिम
- ठाणे
- नाशिक
- पालघर
- औरंगाबाद
- सातारा
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग
- दक्षिण मुंबई
मविआच्या जाहीर न झालेल्या जागा
- धुळे
- जालना
- उत्तर मुंबई
- मुंबई उत्तर मध्य
- माढा
महायुतीमध्ये नऊ जागांवर उमेदवार नाहीत
जागावाटपामध्ये सुरुवातीला आघाडी घेतलेल्या महायुतीमध्ये नंतर मात्र चर्चेच्या फेऱ्या वाढत गेल्या आणि अद्यापही नऊ जागांवरील उमेदवार अंतिम झालेले नाहीत. त्यामध्ये ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदु्र्ग या मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. तर औरंगाबादमधील उमेदवारही अद्याप ठरत नसल्याचं दिसतंय. या आधी अमित शाहांच्या औरंगाबाद दौऱ्यात त्यांनी या जागेवर भाजपला साथ द्या असं आवाहन केलं होतं. त्यामुळेच या जागेवर भाजपने दावा केल्याचंही सांगितलं जातंय.
पालघरच्या बाबतीतही तेच घडत असल्याचं दिसतंय. पालघरमध्येही शिवसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून काहीशी चढाओढ आहे. मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातील उमेदवार अद्याप घोषित केले नाहीत. साताऱ्यामध्ये भाजपने उमेदवार जरी निश्चित केला नसला तरी त्या ठिकाणी उदयनराजे हेच उमेदवार असतील असं सांगितलं जातंय.
महाविकास आघाडीच्या चार जागांचा उमेदवार ठरेना
महाविकास आघाडीमध्ये उत्तर मुंबईची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. पण त्यांच्याकडे उमेदवार नसल्याचं चित्र आहे. त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे विनोद घोसाळकरांनी तयारी सुरू केली आहे. तसेच माढ्याचा तिढा अद्याप सुटला नाही. धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असून त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे धुळे आणि जालन्याची तसचे मुंबई उत्तर मध्यची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आली नाही.
महाराष्ट्रातील मतदारसंघ आणि उमेदवारांची यादी
| मतदारसंघ | ठाकरे गट | शिंदे गट | भाजप | काँग्रेस | राष्ट्रवादी (अजित पवार) | शरद पवार गट | वंचित आघाडी | रिपब्लिकन सेना | |
| नंदुरबार | डॉ. हिना गावित | गोवाल पाडवी | |||||||
| धुळे | सुभाष भामरे | अब्दुल रहमान | |||||||
| जळगाव | करण पवार | स्मिता वाघ | |||||||
| रावेर | रक्षा खडसे | श्रीराम पाटील | संजय ब्राह्मणे | ||||||
| बुलडाणा | नरेंद्र खेडेकर | प्रतापराव जाधव | |||||||
| अकोला | अनुप धोत्रे | अभय पाटील | |||||||
| अमरावती | नवनीत राणा | बळवंत वानखेडे | आनंदराज आंबेडकर | ||||||
| वर्धा | रामदास तडस | अमर काळे | |||||||
| रामटेक | राजू पारवे | रश्मी बर्वे | |||||||
| नागपूर | नितीन गडकरी | विकास ठाकरे | |||||||
| भंडारा-गोंदिया | सुनील मेंढे | डॉ. प्रशांत पडोळे | |||||||
| गडचिरोली-चिमूर | अशोक नेते | डॉ. नामदेव किरसान | |||||||
| चंद्रपूर | सुधीर मुनगंटीवार | प्रतिभा धानोरकर | |||||||
| यवतमाळ - वाशिम | संजय देशमुख | राजश्री पाटील | |||||||
| हिंगोली | नागेश पाटील आष्टीकर | बाबूराव कदम | डॉ. बी.डी. चव्हाण | ||||||
| नांदेड | प्रताप पाटील चिखलीकर | वसंतराव बळवंतराव चव्हाण | |||||||
| परभणी | संजय जाधव | महादेव जानकर | |||||||
| जालना | रावसाहेब दानवे | प्रभाकर बकले | |||||||
| संभाजीनगर | चंद्रकांत खैरे | ||||||||
| दिंडोरी | डॉ. भारती पवार | भास्करराव भगरे | |||||||
| नाशिक | राजाभाई वाजे | ||||||||
| पालघर | भारती कामडी | ||||||||
| भिवंडी | कपिल पाटील | सुरेश म्हात्रे | |||||||
| कल्याण | वैशाली दरेकर | श्रीकांत शिंदे | |||||||
| ठाणे | राजन विचारे | ||||||||
| मुंबई-उत्तर | पियुष गोयल | ||||||||
| मुंबई - उत्तर पश्चिम | अमोल कीर्तीकर | ||||||||
| मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) | संजय दिना पाटील | मिहीर कोटेचा | |||||||
| मुंबई उत्तर मध्य | अबुल हसन खान | ||||||||
| मुंबई दक्षिण मध्य | अनिल देसाई | राहुल शेवाळे | |||||||
| दक्षिण मुंबई | अरविंद सावंत | ||||||||
| रायगड | अनंत गीते | सुनील तटकरे | |||||||
| मावळ | संजोग वाघेरे-पाटील | श्रीरंग बारणे | |||||||
| पुणे | मुरलीधर मोहोळ | रविंद्र धंगेकर | |||||||
| बारामती | सुनेत्रा पवार | सुप्रिया सुळे | |||||||
| शिरुर | शिवाजी आढळराव | डॉ. अमोल कोल्हे | |||||||
| अहमदनगर | सुजय विखे पाटील | निलेश लंके | |||||||
| शिर्डी | भाऊसाहेब वाघचौरे | सदााशिव लोखंडे | |||||||
| बीड | पंकजा मुंडे | बजरंग सोनवणे | |||||||
| धाराशिव | ओमराजे निंबाळकर | अर्चना पाटील | |||||||
| लातूर | सुधाकर श्रृंगारे | शिवाजीराव काळगे | नरिसिंहराव उदगीरकर | ||||||
| सोलापूर | राम सातपुते | प्रणिती शिंदे | राहुल काशिनाथ गायकवाड | ||||||
| माढा | रणजितसिंह नाईक निंबाळकर | रमेश बारसकर | |||||||
| सांगली | चंद्रहार पाटील | संजयकाका पाटील | |||||||
| सातारा | उदयनराजे भोसले | शशिकांत शिंदे | मारुती जानकर | ||||||
| रत्नागिरी-सिंधुदुर्ग | विनायक राऊत | काका जोशी | |||||||
| कोल्हापूर | संजय मंडलिक | शाहू महाराज छत्रपती | |||||||
| हातकणंगले | सत्यजीत पाटील | धैर्यशील माने | दादागौडा चवगोंडा पाटील | ||||||
| एकूण | |||||||||
























