एक्स्प्लोर

पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु

सातारा आणि सांगलीतही महायुती आणि महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

मुंबई : राज्यातील लक्षवेधी जागांवर आज उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. बारामती (Barmati), सांगली(Sangli) , सातारा (Satara)  याठिकाणचे उमेदवार आज अर्ज दाखल करतील. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मविआ आणि महायुतीकडून शक्तिप्रदर्शन केलं जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devndra Fadnavis) नेतृत्वात महायुतीकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. तर सातारा आणि सांगलीतही महायुती (Maha yuti) आणि महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) शक्तिप्रदर्शन पाहायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील प्रमुख उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुनेत्रा पवार ह्या एकमेकींच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुण्यातील कौन्सिल हॉल मधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दोघींचे म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येतील. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे देखील अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांचे अर्ज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात येतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण,शिवसेना नेते खासदार संजय राऊत,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मोठे नेते याप्रसंगी उपस्थित असणार आहेत. या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडी मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे.

सुनेत्रा पवारांचा अर्ज भरून झाल्यानंतर महायुतीची सभा

बारामतीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरून झाल्यानंतर महायुतीची देखील सभा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार या सभेला उपस्थित असणार आहेत. महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज साधारणपणे सकाळी अकराच्या दरम्यान दाखल करण्यात येतील. उमेदवारी अर्ज भरताना मोजकेच पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत असणार आहेत.

उदयन राजेंची साताऱ्यात सभा

उदयन राजे सकाळी 10 वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे, यावेली सातारा जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन उदयनराजे अर्ज दाखल करणार आहेत.

सुनील तटकरे अलिबागला दाखल करणार अर्ज

सुनील तटकरे अलिबागला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच  भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील नेत्यांनी सुनील तटकरे यांच्या विरोधात भूमीका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न सुनील तटकरे यांनी केला आहे. ही निवडणूक जरी लोकसभेची असली तरी याचे पडसाद विधानसभा निवडणुकांवर पडताना पाहायला मिळतील.

हे ही वाचा :

Ajit Pawar: EVM मध्ये कचाकचा बटण दाबा, नाहीतर आमचा हात आखडता येईल : अजित पवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan AttackedABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025Saif Ali Khan Attacked Update : सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोवाल्याने सांगितला घटनेचा थरार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Embed widget