Maharashtra Live Updates: राज ठाकरे यांना काँग्रेस हवी आहे; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मनसेची नाराजी
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या बैठक सत्रांना आजपासून सुरुवात होणार आहे. अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची पश्चिम विदर्भासाठीची आढावा बैठक होणार आहे. तर मुंबई महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत काँग्रेसची मुंबईत बैठक पार पडेल. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेही शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
नाशिकच्या रामकुंडावरील वस्त्रांतर गृह अखेर जमीनदोस्त
नाशिक महापालिकेच्या वतीने रामकाल पथ योजनेअंतर्गत रामकुंड परिसरातील गेल्या दोन सिंहस्थ कुंभमेळ्याचे साक्षीदार असलेल्या वस्त्रांतर गृहाची इमारत अखेर पाडण्यात आली. महापालिकेचे कामकाज दोन दिवसांपासून सुरू होते. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. स्थानिक पुरोहित संघाने याला तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र विरोध डावलून वस्त्रांतर गृह जमीनदोस्त करण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, अजित पवार गटाचे श्याम सनेर यांची मागणी
धुळे : जिल्ह्यात यंदा तीन लाख 80 हजार हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली होती... मात्र अतिवृष्टी मुळे केवळ 12 हजार हेक्टरला फटका बसला असून उर्वरित तीन लाख 68 हजार हेक्टर वरील पिकांचे देखील अनियमित पाऊस आणि नंतरच्या झालेल्या पावसामुळे नुकसान झाले असून केवळ 12 हजार हेक्टर वरील पिकांच्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे... उर्वरित तीन लाख 68 हजार हेक्टर वरील नुकसान झालेल्या पिकांसाठी मदत जाहीर करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे श्याम सनेर यांनी केली आहे...
धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीचा फटका मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बसला आहे... या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेली मदत ही जिल्ह्यातील केवळ 12 हजार हेक्टर वरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार असून जिल्ह्यात यंदा तीन लाख 80 हजार हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली होती... मात्र अतिवृष्टी मुळे केवळ 12 हजार हेक्टरला फटका बसला असून उर्वरित तीन लाख 68 हजार हेक्टर वरील पिकांचे देखील अनियमित पाऊस आणि नंतरच्या झालेल्या पावसामुळे नुकसान झाले असून केवळ 12 हजार हेक्टर वरील पिकांच्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे...उर्वरित तीन लाख 68 हजार हेक्टर वरील नुकसान झालेल्या पिकांसाठी मदत जाहीर करा अशी मागणी अजित पवार गटाचे श्याम सनेर यांनी केली आहे...























