Maharashtra Live Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, सरकारच्या निर्णयांकडे लक्ष
Maharashtra live blog updates in Marathi:महाराष्ट्र, देश-विदेशातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE
Background
Maharashtra live blog updates in Marathi: बीडमधील धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांच्या भेट झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत कोणते निर्णय होतात हे पाहावे लागेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग, राज्य निवडणूक आयुक्तपदाची शिफारस होणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग
राज्य निवडणूक आयुक्त यांच्या नावाची आज होणार शिफारस
मंत्रीपरिषदेच्या बैठकीत चर्चा करुन शिफारस केली जाणार
गेली अनेक दिवसांपासून हे पद रिक्त आहे
एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता
त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या नावाची आज शिफारस केली जाणार
सैफ हल्लाप्रकरणावर पोलीस उपायुक्तांची महत्वाची माहिती
पोलिस उपायुक्त दिक्षीत गेेडाम यांची माहिती
सैफच्या घरी चोरीचा आरोपीचा प्रयत्न होता
पोलिसाची विविध पथकं काम करत आहेत
शिड्यांचा वापर करून सैफच्या घरात आरोपी शिरला
आरोपीची ओळखही पटल्याची सूत्रांची ाहिती
आरोपी १२ माळे चढून घरात शिरला
सैफ अली खान प्रकरणावरून प्रविण दरेकरांनी राऊतांसह पवारांनाही सुनावलं
सैफ अली खान प्रकरणात पोलिस तपास करतायत.लवकरच सत्य बाहेर येईल.
पण लगेच शरद पवार किंवा संजय राऊत यांना राजकीय आखाड्यात उतरण्याची गरज नाही.
प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नसते याचं भान संजय राऊतांना नसेल पण पवारांसारख्या जेष्ठ नेत्याला असायला हवं, असं प्रविण दरेकर म्हणालेत.
धनंजय मुंडे परळी वैजनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी येणार
धनंजय मुंडे देवदर्शनासाठी परळी वैजनाथ मंदिरात दाखल होणार आहेत.
मस्साजोग प्रकरणानंतर ते परळीत भेटीगाठी घेतील
महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करू, स्टार्टअप धोरणाच्या मसूद्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले..
इनोव्हेशन सिटी महाराष्ट्र मध्ये तयार करू, गिफ्ट सिटी तयार झाली तशी सर्व प्रकारें उपयुक्त इनोवेशन सिटी तयार करणार आहोत, अतिशय वेगाने आम्ही काम करू असं मुखमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
नवीन स्टार्ट अप धोरणचा मसुदा सगळ्यासाठी तयार केला आहे त्यावर तुमचे सूचना द्याव्यात पुढच्या दोन महिन्यात महाराष्ट्र सगळ्यात आधुनिक स्टार्टअप पॉलिसी तयार करेल
नवीन संकल्पना या राउंड टेबल मधून समोर येताय आणि त्या आर्टिफिशिंयल इंटेजन्स च्या अवतीभवतीच्या आहे. टेक्नॉलॉजीला घाबरू नका, टेक्नॉलॉजीला घोडा समजून त्यावर स्वार व्हा टेक्नॉलॉजीला चा अवलंब कामात करा ते काम सरकार सध्या सरकार करताय
खाजगी विद्यापीठ हे भविष्यातील हे यासाठी एक मोठे केंद्र होण्याची त्यांची क्षमता आहे
AI पॉवर स्टार्ट अप हब महाराष्ट्र मध्ये तयार करायचा आहे