महाराष्ट्राच्या विधानसभेत 'संजय' नावाचे 10 हून अधिक आमदार, तर 'पाटील' आडनावाचा आकडा दोन डझन
Maharashtra Assembly : महाराष्ट्राच्या विधानसभेत 'संजय' नाव असलेल्या आमदारांचा आकडा 10 हून अधिक आहे, तर पाटील नावाचे आमदार दोन डझन आहेत.

Maharashtra Assembly : गेल्या काही वर्षातील महाराष्ट्राचं राजकारण अनिश्चित राहिलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही होईल, हे सांगता येत नाही. मात्र, आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेत (Maharashtra Assembly) 'संजय' नाव आणि 'पाटील' आडनावाचा असलेला दबादबा किती आहे? हे सांगणार आहोत. (Maharashtra Assembly)
विधानसभेतील "पाटील" गट इतका मोठा झाला आहे की, एक छोटं कार्यमंडळ त्यांच्यापुरतं बनवता येईल – तर "संजय" मंडळींचाही काही कमी जलवा नाही. कुठल्याही पक्षात बघा, एक ना एक संजय सापडतोच – भाजपमधला संजय, शिवसेनेतला संजय, काँग्रेसचा संजय, अगदी राष्ट्रवादीचा सुद्धा संजय! आता जर विधानसभेच्या स्पीकरने "संजय उठ!" असं म्हटलं, तर किमान 10 जण तर उठणारच! आणि "पाटील बाहेर जा!" असं म्हटलं, तर अर्धी सभागृह रिकामं होईल. त्यामुळं विधासभेत संजय आणि पाटलांची हवा आहे हे खरं...
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संजय नावाची हवा आहे. सात महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विधासभेत संजय नावाचे 10 हून अधिक आमदार निवडून आले आहेत. तर पाटील आडनाव असलेले 2 डजन आमदार सभागृहात बसतात
पाटील आडनावाचे आमदार कोण कोण?
गुलाबराव पाटील ,अनिल पाटील, अमोल पाटील, किशोर आप्पा पाटील, चंद्रकांत पाटील ,प्रतापराव पाटील, राहुल पाटील, रवीशेठ पाटील, दिलीप वळसे पाटील ,चंद्रकांत पाटील ,राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब पाटील ,संभाजी पाटील, राणा जगजीतसिंह पाटील, कैलास घाडगे पाटील, अभिजीत पाटील, सचिन पाटील, मकरंद जाधव पाटील ,शिवाजी पाटील ,राजेंद्र पाटील, जयंत पाटील, रोहित पाटील
नंदुरबारपासून नागपूरपर्यंत आणि चंद्रपूरपासून सिंधुदुर्गापर्यंत... कोल्हापूर पासून ते नंदुरबारपर्यंत जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून कोण ना कोण पाटील आडनावाचा आमदार विधानसभेत आहे...
महाराष्ट्राच्या राजकारणात पाटील आडनावाचा इतिहास अगदी पुरातन आहे. सध्याच्या विधानसभेत आहे. साठी ओलांडलेल्या जयंत पाटलांपासून ते अगदी तरुण तुर्क अशा रोहित पाटलापर्यंत चांद्यापासून ते बांद्यापर्यंतच्या मतदार संघातून जवळपास दोन डझन आमदार पाटील आडनावाचे आहेत..
विद्यमान सरकारला आकड्यांचा कोणताही तोटा नसला तरी 22 संख्याही काही कमी नाही... कारण, 32 आमदारांच्या संख्येनं मिझोरामसारखी अख्खी राज्य चालतात... गोव्यासारख्या राज्यात एकूण 40 आमदार विधानसभेत पोहोचतात.. आणि आपल्याकडे फक्त 40 आमदारांनी बंड जरी केलं, तरी सरकारं गडगडतात...
पाटील आमदारांच्या आघाडीनंतर दुसऱ्या स्थानी आहेत संजय.......2019 पासून संजय नावाच्या राजकीय व्यक्तींच्या करामती आणि कुरापतीही चर्चेत आहेत...महाराष्ट्राच्या राजकारण सध्या विधानसभेत नसले तरी त्यांच्या शिवाय राजकारणाची सकाळच होत नाही. संजय राऊत यांचं नाव घेतलं नाही तर कसं चालेल..संजय राऊत आपल्या शैलीतील वेगवेगळ्या वक्तव्याने चर्चेत असतात. ते त्यांचा पक्ष टिकवण्याची कसरत देखील करताना पाहायला मिळतात. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाट यांनाही आरोपाने घेरल्याने ते चर्चेत आहेत. तर कधी संजय राठोड तर कधी संजय गायकवाड आपणही संजय असल्याचं वक्तव्यातून दाखवून देतात...
वादात., चर्चेत आणि दर दुसऱ्या-तिसऱ्या बातमीआड फक्त संजय राऊतच झडकतात असंही नाहीत. कधी संजय गायकवाड तलवार घेवून हेडलाईनमध्ये येतात....तर कधी शिंदे सेनेचे प्रवक्ते म्हणून संजय शिरसाट... ठाकरेंच्या संजय राऊतांना प्रत्युत्तर देतात....अशी एकूण संजय नावाच्या आमदारांची संख्या जवळपास 10 वर जाते...
संजय नावाचे आमदार किती?
1. संजय उपाध्याय – बोरीवली मतदारसंघ, भारतीय जनता पक्ष
2. संजय गोविंद पोटनीस – कालिना मतदारसंघ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
3. संजय दुलीचंद राठोड – दिग्रस मतदारसंघ, शिवसेना
4. संजय रामभाऊ गायकवाड – बुलढाणा मतदारसंघ, शिवसेना
5. संजय श्रीराम कुटे– जळगाव (जामोद) मतदारसंघ, भारतीय जनता पक्ष
6. संजय पांडुरंग शिरसाट – औरंगाबाद पश्चिम (SC) मतदारसंघ, शिवसेना
7. संजय वामन सावकारे – भुसावळ (SC) मतदारसंघ, भारतीय जनता पक्ष
8. संजय नारायणराव मेस्राम – उमरेड (SC) मतदारसंघ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
9. संजय पुरम – आमगाव (ST) मतदारसंघ, भारतीय जनता पक्ष
10. संजय बाबुराव बनसोडे – उदगीर (SC) मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
एकूण : 10 आमदारांचे नाव "संजय" आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























