एक्स्प्लोर

काल कर्नाटक, आज महाराष्ट्र, विधानसभेच्या डेस्कवर आंबेडकरांचे फोटो, अमित शाहांच्या विधानामुळे सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

अमित शाहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भाने केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळात उमटले. त्यामुळे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत उमटले आहेत. कालपासून (19 डिसेंबरपासून) महाराष्ट्रासह देशभरात शाहा यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. कर्नाटकच्या विधानसभेत लोकप्रतिनिधींच्या डेस्कवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावण्यात आले होते. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही असेच चित्र पाहायला मिळाले. या फोटोमुळे नंतर  सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. परिणामी महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. 

विधानसभेत नेमकं काय घडलं? 

विधानसभेचे कामकाज नियमितपणे चालू झाले. मात्र सभागृहाचे कामकाज चालू होताच विरोधकांनी आपापल्या बाकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले. अमित शाहा यांनी डॉ. आंबेडकरांना केलेल्या विधानाचा निषेध म्हणून विरोधकांनी हे फोटो लावले होते.

आंबेडकरांचे फोटो आमच्या बाजूनेही लावावेत- अजित पवार

विरोधकांच्या बाकावर आंबेडकरांचे फोटो पाहताच उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक झाले. अजित पवार त्यांनी उभे राहून विधानभा अध्यक्षांना उद्देशून बाबासाहेब यांच्यावर आमचाही अधिकार आहे. त्यामुळे ⁠तुम्ही काही ठिकाणीच बाबासाहेबांचे फोटो लावण्यास परवानगी दिली आहे. आंबेडकरांचे फोटो आमच्या बाजूनेही लावावेत. तशी परवानगी आम्हाला द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. 

महापुरुषांचे फोटो लावण्याची परवानगी नाही- राहुल नार्वेकर

अजित पवार यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्षांनी मी अशा प्रकारची कोणतीही परवानगी दिलेली नाही. ⁠दैवत किंवा महापुरुषांचे फोटो लावण्याची परवानगी नाही. ⁠या सभागृहाची परंपरा राखली पाहिजे, असे आवाहन करून विधानसभा अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो काढण्याचे आवाहन केले. 

सत्ताधारी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

मात्र, विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांचे आवाहन धुडकावून लावले. त्यानंतर सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्यास आम्हालाही परवानगी द्या अशी मागणी करत सत्ताधारी आमदार आणि मंत्री आक्रमक झाले. त्यानंतर भाजप आमदार वेलमध्ये उतरले. एकच साहेब बाबासाहेब म्हणून भाजप आमदारांनी घोषणा दिल्या. तर आंबेडकर, आंबेडकर म्हणून विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणा दिल्या. परिणामी वाढत असलेला गोंधळ लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्षांनी सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब केले.

हेही वाचा :

Sanjay Raut on Kalyan Incident: मोदी-शाह-फडणवीसांना मुंबई व्यापारी आणि बिल्डर्सच्या घशात घालायची आहे, मराठी माणसांची ताकद नष्ट करण्याचे प्रयत्न: संजय राऊत

Suresh Dhas : 'आका'चं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लिकर लायसन्स घेतले, बीड प्रकरणावरून सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

कोणत्याही प्रार्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिरे असल्याचा दावा उठसूट करणे योग्य नाही: सरसंघचालक मोहन भागवत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Beed Police: वाल्मिक कराडला ठेवलेल्या पोलीस स्टेशनमध्ये अचानक 5 पलंग का आणले? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट, पोलीस ठाण्यात पलंगाची व्यवस्था? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Dhananjay Munde: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Video: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Ambadas Danve on Walmik Karad : अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Cabinet meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून, कॅबिनेट बैठकीत 2 निर्णयDhananjay Munde: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा,पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोललेTop 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 January 2025 : ABP MajhaKolhapur News : ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् मृत आजोबा जिवंत झाले, कोल्हापुरातील प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Beed Police: वाल्मिक कराडला ठेवलेल्या पोलीस स्टेशनमध्ये अचानक 5 पलंग का आणले? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट, पोलीस ठाण्यात पलंगाची व्यवस्था? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Dhananjay Munde: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Video: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Ambadas Danve on Walmik Karad : अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
Fetisch Barbie : 'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
Maharashtra government Cabinet meeting: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Embed widget