Sanjay Raut : मविआत दोस्तीत कुस्ती होणार? 7 ते 8 जागांवरील मैत्रीपूर्ण लढतीवर राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले, उद्या दुपारपर्यंत...
Maharashtra Assembly Elections 2024 : महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. मविआतल्या घटक पक्षांनी एकाच मतदार संघात दोन उमेदवार दिले आहेत.
![Sanjay Raut : मविआत दोस्तीत कुस्ती होणार? 7 ते 8 जागांवरील मैत्रीपूर्ण लढतीवर राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले, उद्या दुपारपर्यंत... Maharashtra Assembly Elections 2024 sanjay raut big statment on rebellion in Mahavikas Aghadi Marathi News Sanjay Raut : मविआत दोस्तीत कुस्ती होणार? 7 ते 8 जागांवरील मैत्रीपूर्ण लढतीवर राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले, उद्या दुपारपर्यंत...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/03/3bc27967477494ca77d787b1158b5d691730610929624923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसह अनेक बंडखोरांनीही उमेदवारी दाखल केली आहे. त्यात महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) ही अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. मविआतल्या घटक पक्षांनी एकाच मतदार संघात दोन उमेदवार दिले आहेत. भिवंडी, परंडा, मुलुंडसह 7 ते 8 जागांवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडून दोन उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे या मतदार संघात मैत्रीपूर्ण लढती होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
महाविकास आघाडीत भिवंडी येथे रुपेश म्हात्रे यांनी बंड केले आहे. परांडा येथे बंड झाले आहे. चार तारखेला थंड होणार का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, निवडणूक काळात कोण काय आरोप करत आहे हे फार गांभीर्याने घ्यायचं नसतं. काही जागा या मित्र पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागा होत्या. त्या जागांवर वारंवार चर्चा होऊन सुद्धा तडजोड होऊ शकली नाही. जशा शिवसेनेच्या विद्यमान आमदारांच्या अनेक जागा आम्ही सोडल्या नाही. काँग्रेसच्या जागा ते सोडू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी कोणीही आपल्या निवडून आलेल्या जागा सोडायला तयार नव्हते. हे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. भिवंडीच्या जागेविषयी आमचे माजी आमदार रुपेश म्हात्रे सांगतात ती जागा आम्हाला मिळावी. या जागेसाठी आम्ही प्रयत्न केले. पण समाजवादी पार्टीचा विद्यमान आमदार तिकडे आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेसाठी प्रयत्न केले. पण समाजवादी पार्टीने जागा सोडली नाही. अशावेळी आमच्या समोर दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही, असेही त्यांनी म्हटले.
उद्या दुपारपर्यंत आमच्याकडे वेळ
इतर सात ते आठ ठिकाणी महाविकास आघाडीचे दोन-दोन उमेदवार रिंगणात आहेत. महायुती 4-5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. महाविकास आघाडीत देखील मैत्रीपूर्ण लढत होणार का? याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आम्ही मैत्रीपूर्ण लढतील पडणार नाही. महाराष्ट्रात सात ते आठ ठिकाणी दोन-दोन उमेदवार आहेत. मुलुंडच्या अधिकृत उमेदवार संगीता वाजे आहेत. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्म दिला आहे. तरी तिथे काँग्रेसच्या उमेदवाराने एबी फॉर्म घेऊन अर्ज भरला. आम्ही त्यांना अधिकृत मानत नाही. असे काही ठिकाणी घडलेले असेल तर आज आणि उद्या दुपारपर्यंत आमच्याकडे वेळ आहे. त्यातून आम्ही मार्ग काढू, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील
परंडा आणि अजून एक दोन ठिकाणी दोन ए बी फॉर्म गेलेले आहेत. काही ठिकाणी गैरसमजातून घडले आहे तर काही ठिकाणी का घडले याचा आम्ही शोध घेत आहोत. काही ठिकाणी आमचे शिवसेनेच्या त्या त्या ठिकाणच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला. त्यात जुन्नर, चंद्रपूर, मुंबईत एक दोन मतदारसंघ आहेत. राष्ट्रवादीकडून काही ठिकाणी झाले आहे. काँग्रेसकडून काही ठिकाणी झाले आहे. सातत्याने आम्ही तीनही पक्षाचे नेते संवाद आणि संपर्कात आहोत. हे सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील आणि एकास एक लढत होईल, याची आम्ही काळजी घेऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा
Ajit Pawar: अजित पवारांचे आज गाव भेट दौरा सुरु, ताई- दादांची भाऊबीज एकत्र होणार का?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)