Pathri Vdhan Sabha Election 2024 Result : परभणीत राजेश विटेकर यांचा दणदणीत विजय, सुरेश वरपूडकर यांचा पराभव!
Parbhani MLA List : मराठवाड्यातील पाथरी या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या जागेवर नेमकं कोण बाजी मारणार असे सर्वजण विचारत होते. शेवटी या जागेचा निकाल समोर आला आहे.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024 Result) उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांकडून अटोकाट प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी अनेक नेत्यांनी पूर्ण ताकदीने शक्तिप्रदर्शन केले. मराठवाड्यातील मतदारसंघांकडे यावेळी विशेष लक्ष होते. कारण मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांमुळे हा भाग चांगलाच ढवळून निघालेला होता. याच मराठवाड्यात पाथरी हा मतदारसंघ आहे. या जागेवरून उमेदवारी मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे नेते प्रयत्न करत होते. शेवटी या मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. येथे अजित पवार यांच्या पक्षाचे राजेश विटेकर (RAJESH UTTAMRAO VITEKAR) यांचा विजय झाला आहे. त्यांनी सुरेश वरपूडकर (WARPUDKAR SURESH AMBADASRAO) यांचा पराभव केला आहे.
2024 सालच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं?
2024 सालची निवडणूक निवडणूक अनेक अर्थांनी खास होती. पाथरी या मतदारसंघात बाबाजानी दुर्राणी, सईद खान असे नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे येथे चौरंगी लढत झाली. या मतदारसंघासाठी मतमोजणीच्या एकूण 31 फेऱ्या झाल्या. या प्रत्येक फेरीत राजेश विटेकर आणि सुरेश वरपूडकर यांच्यात स्पर्धा लागली होती. मात्र शेवटी राजेश विटेकर यांनी बाजी मारली. त्यांनी सुरेश वारपूडकर यांना पराभूत केले. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे सईद खान हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 50 हजारपेक्षा जास्त मते मिळाली. अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले बाबाजानी दुर्राणी हे चौथ्या स्थानावर राहिले. त्यांना 48 हजारापेक्षा जास्त मतं मिळाली.
सुरेश वरपूडकर यांचा विजय
पाथरी विधानसभा मतदारसंघ अनेक अर्थांनी विशेष आहे. गेल्या चार निवडणुकांत या मतदारसंघाने प्रत्येक वेळी नव्या उमेदवाराला निवडून दिलेलं आहे. म्हणजेच गेल्या चार निवडणुकांत एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा निवडून आलेला नाही. 2019 च्या निवडणुकीत इथे तत्कालीन अपक्ष आमदार मोहन फड यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे सुरेश वरपुडकर यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांनी 1 लाख 5 हजार 625 मतं घेतली होती. तर मोहन फड यांना 90 हजार 851 मते मिळाली होती. म्हणजेच मोहन फड यांना 14774 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत वंचितच्या विलास बाबर यांनी 21702 मतं घेतली होती. चौथ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार डॉ. जगदीश शिंदे होते. त्यांना एकूण 8520 मते मिळाली होती.
कोण किती जागांवर आघाडीवर?
भाजपा-139
शिवसेना (एकनाथ शिंदे)- 54
राष्ट्रवादी (अजित पवार)- 40
शिवसेना (ठाकरे गट)- 20
राष्ट्रवादी (शरद पवार)- 13
काँग्रेस-19
हेही वाचा :
Parbhani Assembly Election : परभणीत नेमकी कोणाची ताकद, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार?