Mahadev Jankar : 'उद्धव ठाकरे अन शरद पवारांबद्दल लोकांमध्ये सहानुभूती, पण महायुतीला..' महादेव जानकरांचे थेट वक्तव्य
Mahadev Jankar : महादेव जानकर यांनी अप्रत्यक्षरित्या मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर न घेता आरोप केला. ते म्हणाले की, बीड आणि परभणीमध्ये ओबीसी-मराठा वाद हा मविआने खतपाणी घालून केला
![Mahadev Jankar : 'उद्धव ठाकरे अन शरद पवारांबद्दल लोकांमध्ये सहानुभूती, पण महायुतीला..' महादेव जानकरांचे थेट वक्तव्य Mahadev Jankar says People sympathize with Uddhav Thackeray and Sharad Pawar After Chhagan Bhujbal the public statement of the leader in the mahayuti Mahadev Jankar : 'उद्धव ठाकरे अन शरद पवारांबद्दल लोकांमध्ये सहानुभूती, पण महायुतीला..' महादेव जानकरांचे थेट वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/b1f4c1d22e7ed237ce53c646d7b119db1716372811773736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mahadev Jankar : राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election 2024) मी 55 सभा घेतल्या. यावेळी मला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल सहानुभूती दिसून आली. मात्र, तरीसुद्धा महायुतीच्या 42 जागा निवडून येणार आहेत असा दावा रासपचे महादेव जानकर यांनी व्यक्त केला. बारामतीत सुनेत्रा पवार, बीडमध्ये पंकजा मुंडेही आणि परभणीमध्ये मी निवडून येणार, ही काळ्या दगडावरील पांढरी रेष असल्याचे जानकर म्हणाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती होती, असे म्हटले होते.
मनोज जरांगेंवर नाव न घेता आरोप
दरम्यान, यावेळी बोलताना महादेव जानकर यांनी अप्रत्यक्षरित्या मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर न घेता आरोप केला. ते म्हणाले की, बीड आणि परभणीमध्ये ओबीसी-मराठा वाद हा महाविकास आघाडीने खतपाणी घालून केला. याला तोच जबाबदार आहे असा गंभीर आरोप नाव न घेता महादेव जानकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला. बीड आणि परभणीत सर्वात जास्त कोण फिरलं हे बघायला पाहिजे, कुठल्याही एका जातीवर राजकारण करणं हे चुकीचं असल्याचंही महादेव जानकर म्हणाले.
परभणीचा खासदार म्हणून शपथ घेईन
जानकर यांनी परभणीकरांचे आभार मानले. परभणीचा खासदार म्हणून शपथ घेईन, असेही महादेव जानकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, त्यांनी मला लवकर स्वीकारले. विकासाच्या मुद्यांवर जनतेनं प्रेम दिलं. सर्व समाजातील लोकांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला. 4 जून रोजी विजयाचा गुलाल माझा असेल. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे संजय जाधव यांच्यात मुकाबला आहे. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान झालेले आहे. 4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
संजय जाधव यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट
दरम्यान, परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी आज (22 मे) मनोज जरांगे यांची भेट घेतली. परभणीमधील पोखरणीमध्ये मनोज जरांगे आले असता याच ठिकाणी भेट घेत संजय जाधव यांनी सत्कार केला. निवडणुकीनंतर मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आपल्याला फायदा झाला असल्याचं संजय जाधव यांनी कबूल केलं होतं. तसेच आपण त्यांना भेटणार असल्याचेही सांगितलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी आज ही भेट घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)