Mahadev Jankar on Sanjay Jadhav : लोकच मला निवडणुकीत पैसे देत आहेत, मी कधीच पैसे वाटत नाही, माझी गाडी अडवणे योग्य नाही, महादेव जानकरांचे संजय जाधवांना प्रत्युत्तर
Mahadev Jankar on Sanjay Jadhav : निवडणुकीत पराभव दिसत आहे. त्यामुळे संजय जाधव यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी कधीही पैसे वाटत नाही. उलट लोकच मला निवडणुकीसाठी पैसे देत आहेत.
Mahadev Jankar on Sanjay Jadhav : "निवडणुकीत पराभव दिसत आहे. त्यामुळे संजय जाधव यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी कधीही पैसे वाटत नाही. उलट लोकच मला निवडणुकीसाठी पैसे देत आहेत. मराठा ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाचा वाद मी लावला नाही. सर्व समाज घटक माझ्यासोबतच आहेत. माझी गाडी अडवून तपासणी करणे योग्य नाही. वैचारिक लढाई लढायला हवी", असे महायुतीचे परभणी लोकसभेसाठीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले. ठाकरे गटाचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Jadhav) यांनी जानकरांवर पैसे वाटपाचे आरोप केले होते. त्याला जानकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
महादेव जानकर काय काय म्हणाले?
महायुतीचे उमेदवार महादेव जानकर म्हणाले, संजय जाधव यांना पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच गाडी थांबून अडवण्याचे प्रकार ते करत असल्याचं आरोप महादेव जानकर यांनी केलाय. शिवाय मी कधीही कुणाला पैसे वाटले नाही. उलट मलाच लोक निवडणुकीसाठी पैसे देत आहेत. कुठल्याही यंत्रणेचा गैरवापर मी केला नाही. माझ्यासोबत सर्व समाज घटक आहेत. मी कधीही कुठल्याही समाजाचा वाद लावला नाही, असं महादेव जानकर यांनी सांगितले आहे. महादेव जानकर यांची काल रात्री गाडी अडवून त्यांची गाडीची तपासणी करण्यात आल्याचा आरोप जानकर यांनी केला आहे. या प्रकरणी संजय जाधव यांच्या कार्यकर्त्यांसह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
परभणीत महादेव जानकर आणि संजय जाधव आमने-सामने
महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरुद्ध ठाकरे गटाने विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना मैदानात उतरवले आहे. संजय जाधव गेल्या 10 वर्षांपासून परभणीचे खासदार आहेत. त्यामुळे विजयाची हॅटट्रीक करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी आणि मराठा समाजाची लोकसंख्या आहे. त्यामुळे लोकसंख्येचा विचार करुनच जानकर यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
महादेव जानकर बाहेरचे असल्याचे आरोप
महादेव जानकर हे बाहेरचे आहेत. बाहेरून येऊन ते परभणीमध्ये निवडणुक लढवत आहेत, असं संजय जाधव यांनी केला आहे. संजय जाधव यांनी उपरा विरुद्ध स्थानिक असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर महादेव जानकर यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही लातूरहून परभणीत आला आहेत, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. शिवाय तुम्हाला इंग्रजी येत नाहीत, तू छोटा माणूस आहे. माझ्या नादाला लागू नको, असा इशाराही जानकर यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या