Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीचं ठरलं, जागा वाटपाचा फॉर्म्युला 'एबीपी माझा'च्या हाती
Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी 'ठाकरे- पवार आणि कांग्रेसचं ठरलं', असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटप जवळपास 60 टक्के पुर्ण झाल्याची माहिती आहे.
कसा असेल जागा वाटपाचा फॉर्म्युला
288 पैकी 100 जागा काँग्रेस, 100 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना तर 84 जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढेल, असे बोलले जात आहे. तर उर्वरित 4 जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे. 2019 साली जिंकलेल्या काही जागांवर महाविकास आघाडीचं ठरलंय. तीनही पक्षाच 60 टक्के जागांवर एकमत असल्याची माहिती आहे. काही जागांवर अजूनही तिढा कायम पण लवकरच सोडवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सहमती झाल्याची सूत्रांची माहिती
महाविकास आघाडीचे जवळपास 80 टक्के जागा वाटपावर चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागावाटपाची चर्चा करण्यात आली आहे. 120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला जागा वाटपात दिला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. जिंकलेल्या जागांमध्ये दहा ते वीस टक्के बदल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागातील विधानसभा मतदारसंघातील जागांवर सविस्तर चर्चा
पहिल्या बैठकीत मुंबई -कोकण आणि त्यानंतर मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र या विभागातील विधानसभा मतदारसंघातील जागांवर सविस्तर चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पार पडली. तिढा असलेल्या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून एक एजन्सी नेमून कोणत्या पक्षाची जास्त ताकद आहे,हे जाणून घेतले जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय शेवटच्या टप्प्यात घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विदर्भातील विधानसभा जागांवर पुढील बैठकीत चर्चा होऊन त्या संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाईल, लवकरात लवकर जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी नेते प्रयत्न करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या