एक्स्प्लोर

Shirur Lok Sabha: शिरुरमध्ये तिहेरी लढत, वंचितकडून दोन वर्षे जेलवारी झालेल्या मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर

Shirur Lok Sabha Constituency: खंडणी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात दोन वर्षे तुरुंगात बंद असलेल्या आणि काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. 

पुणे : राज्यात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि वंचितची (Vanchit Bahujan Aaghadi) जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीने मविआच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. वंचित आघाडीनं पुण्यातून वसंत मोरेंना (Vasant More) उमेदवारी जाहीर केली तर शिरुर लोकसभा मतदारसंघातून  मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  खंडणी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात दोन वर्षे तुरुंगात बंद असलेल्या आणि काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. 

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मंगलदास बांदल यांना 26 मे 2021 ला पोलीसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुढची दोन वर्षे मंगलदास बांदल तुरुंगात बंद होते. त्याआधी पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्पाय कॅमेराच्या माध्यमातून चित्रीकरण करून त्या सराफ व्यावसायिकाला पन्नास कोटी रुपयांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून देखील मंगलदास बांदल यांना आधी अटक करण्यात आली होती. मंगलदास बांदल यांच्यावर पुण्यातील रांजणगाव एम आय डी सी परिसरात खंडणी आणि अपहरणाचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

मंगलदास बांदल हे यांनी 2009 ला भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढवली होती. त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तर त्याआधी ते अपक्ष उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. 2019 ला त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तुरुंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर मंगलदास बांदल यांनी राज ठाकरे ' अजित पवार ' शरद पवार ' देवेंद्र फडणवीस अशा अनेक नेत्यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला होता. शिरुरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी देखील मंगलदास बांदल उपस्थित होते. त्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर मनोज जरांगे यांचीही त्यांनी भेट घेतली होती.त्यानंतर  वंचित बहुजन आघाडीकडून मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आलीय.  शिरुरमध्ये आढळराव पाटील, अमोल कोल्हे आणि मंगलदास बांदल यांच्यात तिहेरी लढत   होणार आहे.

वंचितचे आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार 

  • नांदेड - अविनाश बोसिरकर
  • परभणी-  बाबासाहेब उगळे
  • छत्रपती संभाजीनगर - अफसर खान
  • पुणे -  वसंत मोरे 
  • शिरूर - मंगलदास बांदल 
  • हिंगोली - डॉ. बी.डी. चव्हाण
  • लातूर - नरिसिंहराव उदगीरकर
  • सोलापूर - राहुल काशिनाथ गायकवाड
  • माढा - रमेश नागनाथ बारसकर
  • सातारा - मारुती धोंडीराम जानकर
  • धुळे - अब्दुल रहमान
  • हातकणंगले - दादासाहेब उर्फ दादागौडा चवगोंडा पाटील
  • रावेर - संजय पंडीत ब्राम्हणे
  • जालना - प्रभाकर देवमन बकले
  • मुंबई उत्तर मध्य - अबुल हसन खान
  • रत्नागिरी सिंधुदुर्ग - काका जोशी

हे ही वाचा :

वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय; पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना जाहीर पाठिंबा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget