एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या खास मोहऱ्यालाच रिंगणात उतरवलं, उत्तर-पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना उमेदवारी
Ravindra Waikar: उत्तर पश्चिम मुंबई येथून अखेर रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर असा सामना पाहायला मिळणार आहे
मुंबई: उत्तर पश्चिम मुंबई येथून अखेर रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम (Mumbai North West) लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. वायकरांच्या उमेदवारीला मित्र पक्षातील काही जणांकडून विरोध होत होता. अखेर त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणारे ठाकरे गटाचे शेवटचे आमदार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर असा सामना पाहायला मिळणार आहे
रवींद्र वायकरांना लोकसभेची उमेदवारी कशी मिळाली?
रवींद्र वायकर हे सोमवारी रात्री उशीरापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरी होते. ते एकटेच एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते. यावेळी या दोघांमध्ये बराच काळ चर्चा सुरु होती. या बैठकीअंती वायव्य मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. रवींद्र वायकर हे रात्री अडीचच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना वायव्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
रवींद्र वायकरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
रविंद्र वायकर हे महिन्याभरापूर्वीच शिंदे गटात सामील झाले होते. उद्धव ठाकरे गटात असताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले. 19 बंगल्याचा घोटाळा किंवा उद्धव ठाकरेंच्या अनेक घोटाळ्यांमध्ये त्यांचे नाव होते. त्यामुळे त्यांची ईडीची चौकशी सुरू होती. अशातच रविंद्र वायकरांना शिंदे गटात प्रवेस केला होता. यामुळे प्रचंड वारे उलट्या दिशेने वाहत होते. उद्धव ठाकरे यांचे प्रचंड विश्वासू अशी वायकरांची ओळख होती. उद्धव ठाकरेंना ते शेवटपर्यंत सोडणार नाही अशी चर्चा होती. मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंची साख सोडून एकनाथ शिंदेसोबत आले. ज्यावेळी उत्तर पश्चिम मतदारसंघाची चर्चा होत होती जो त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणहून ते निवडून येत आहे. ज्यावेळी या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची वेळ आली त्यावेळी रवींद्र वायकरांचे नाव येत होते. अखेर आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर लढणार? (Amol Kirtikar Vs Ravindra Waikar)
गजानन कीर्तिकर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. अमोल कीर्तिकर यांना ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. आता एकेकाळी उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेल्या रवींद्र वायकर यांच्याशी त्यांची लढत होणार आहे.
Video :