एक्स्प्लोर

Kishori Pednekar Enquiry : 'कर नाही त्याला डर कशाला', दादर पोलिसांकडून अडीच तासांच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

Kishori Pednekar Enquiry : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज दादर पोलिसांकडून सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली.

Kishori Pednekar Enquiry : मुंबईच्या माजी महापौर (Former Mumbai Mayor) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची आज दादर पोलिसांकडून (Dadar Police) सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली. पोलिसांनी जे प्रश्न विचारले, त्यांची मला माहिती असलेली उत्तरं दिली, असं किशोरी पेडणेकर यांनी चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच पोलिसांनी यानंतर आपल्याला चौकशीला बोलावलेलं नाही, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये घोटाळा (SRA Scam) केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. दादर पोलिसांकडून दुसऱ्यांदा किशोरी पेडणेकर यांची चौकशी झाली. 

कर नाही तर डर कशाला : किशोरी पेडणेकर
चौकशीनंतर दादर पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर माध्यमांशी किशोरी पेडणेकर यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, "पोलिसांचं बोलावणं आलं तेव्हाच मी सांगितलं की तीन दिवस मी बिझी आहे, पण मी येणार चौकशीला. कर नाही तर डर कशाला? ती म्हण मी कायम ठेवली. अडीच तास पोलिसांची चौकशी झाली. पण बराच वेळ गप्पांमध्ये गेला. पण त्यानंतर प्रश्न विचारले त्यांची मी मला माहित असलेली उत्तरं दिली." तसंच प्रत्येक आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांनी लगावला. 

साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार सुरु : किशोरी पेडणेकर
"ज्या पद्धतीने हे रंगवलं जातंय त्यामधलं दहा टक्केही खरं नाही. साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार सुरु आहे. मी कायद्याची लढाई लढत आहे. मी कोणत्याही आरोपांना उत्तर देणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. माझं निवेदन घेऊन जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मूळ शिवसैनिक म्हणून मी त्यांना भेटणार आहे. तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे," असं किशोरी पेडणेकर यांनी यावेळी सांगितलं.

किरीट सोमय्यांचे किशोरी पेडणेकरांवर आरोप
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून दररोजच आरोपांच्या फैरी झडत आहेत. आधीच झालेल्या SRA संबंधित घोटाळ्यात आरोपानंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर याच एसआरए प्रकल्पातील सहा गाळे पेडणेकरांनी हडपले असल्याचाही आरोप सोमय्यांनी केला आहे. आता याच प्रकरणात खोट्या सह्या करुन नातेवाईकांच्या नावे घोटाळा केल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला आहे.  

Kishori Pednekar : माजी महापौर किशोरी पेडणेकर दादर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget