Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा हल्ला
Jitendra Awhad, Thane : माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालाय. आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे जात असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवत त्यांच्यावर हल्ला केलाय.
![Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा हल्ला Jitendra Awhad SambhajiRaje Swarajya organization attacked Jitendra Awhad car Maharashtra Politics Marathi News Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/01/cf8e9fecdd386b7f39d505a3678c7ad91722509610174924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jitendra Awhad, Thane : माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालाय. आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे जात असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवत त्यांच्यावर हल्ला केलाय. सीएसटीएम कडून इस्ट्न फ्री वे वर जाताना त्यांच्या कारवर हल्ला झालाय. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ल्या केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. संभाजीराजे छत्रपती यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय.
जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केला
जितेंद्र आव्हाड त्यांच्या गाडीतून प्रवास करत असताना 3 ते 4 हल्लेखोर आले त्यांनी गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. ठाण्याच्या दिशेने आव्हाड त्यांच्या घरी निघाले होते. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केला, अशी भूमिका स्वराज्य संघटनेने मांडली आहे. आव्हाडांनी माफी मागावी, अशी मागणी देखील स्वराज्य संघटनेने केली होती.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या विसंगत त्यांची भूमिका होती
मी घराकडे जात असताना गाडीवर दगड पडल्याचा आवाज आला. गाडी थांबवायला सांगितली, त्यानंतर हा हल्ला झालाय. संभाजी राजेंची चूक होती. विशाळगडावर जे काही झालं, ते त्यांच्या आडून झालं. त्यांची भूमिका योग्य नव्हती. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या विसंगत त्यांची भूमिका होती. हे मी आज देखील सांगत आहे. राजर्षी शाहू महाराजांचं रक्त सर्वांना बरोबर घेऊन जाणारांचं रक्त होतं. त्यांचं भांडण लावणारं रक्त नव्हतं. शाहू महाराजांचा विचार एक टक्का देखील संभाजीराजेंमध्ये नाही, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Amol Mitkari: पोलिसांनी रिव्हॉल्व्हरने माझ्या डोक्यात गोळ्या झाडाव्यात, माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री शिंदे कारवाई करणार आहेत का? अमोल मिटकरींचा संतप्त सवाल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)