ED : ईडीने टाच आणलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याचा निलांबरी प्रोजेक्ट काय आहे? जाणून घ्या ए टू झेड माहिती
ईडीने श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टवर टाच आणत यातील 11 सदनिका जप्त केल्या आहेत.
![ED : ईडीने टाच आणलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याचा निलांबरी प्रोजेक्ट काय आहे? जाणून घ्या ए टू झेड माहिती ED action on CM Uddhav Thackeray brother in law What is Nilambari Project know the details ED : ईडीने टाच आणलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याचा निलांबरी प्रोजेक्ट काय आहे? जाणून घ्या ए टू झेड माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/6ecb467be16da2cc0fa986d0e2cf129e_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: ईडीने आज मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे असलेल्या श्रीधर पाटणकरांच्या कंपनीवर कारवाई केली. पुष्पक बुलियन या कंपनीच्या संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे.
काय आहे निलांबरी प्रोजेक्ट?
पत्ता- नीलांबरी, शास्त्री नगर, वर्तकनगर, ठाणे
ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टमधील या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. ही एकूण 24 मजल्यांची बिल्डिंग आहे. मागील वर्षीच या प्रोजेक्टचं काम पूर्ण झालं असून सहा महिन्यांपासून येथे काही रहिवासी राहत आहेत. श्री साईबाबा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने या प्रोजेक्टचं काम केलं आहे. 24 व्या मजल्यावर श्रीधर पाटणकर यांचे ऑफिस असल्याचं सांगितलं जातंय.
एकूण किती फ्लॅट्स-
- एकूण 24 माळ्याची इमारत आहे.
- एकूण फ्लॅट्स 155 आहेत.
- पहिल्या 6 माळ्यावर प्रत्येकी 4 फ्लॅट्स.
- सातव्या माळ्यापासून प्रत्येकी 8 फ्लॅटस.
फ्लॅट्सची एकूण किंमत किती?
यामध्ये वन बीएचके आणि टू बीएचके फ्लॅट्स आहेत. यात वन बीएचके फ्लॅटची किंमत ही 75 ते 85 लाख रुपये आहे. तर टू बीएचकेची किंमत ही 1 कोटी 20 लाख रुपये इतकी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून काही लोक येथे राहायला आले आहेत. अजूनही काही फ्लॅट्स रिकामे आहेत. काही फ्लॅट्स विकले गेले आहेत पण त्या ठिकाणी लोक राहायला आले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Uddhav Thackeray : ईडीची थेट उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर कारवाई; 6.45 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच
- न्यायालयावर दबाव असल्याने त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही, उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- ED : मी माझ्या पोरीला महाराष्ट्रात ठेवणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ईडीच्या कारवाईनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)