Jayant Patil on Narendra Modi : उद्धव ठाकरे शत्रू नाहीत तर, त्यांचा पक्ष का फोडला? महाराष्ट्र हातातून गेल्याने मुलाखत देण्याची वेळ, जयंत पाटलांची पीएम मोदींवर टीका
Jayant Patil on Narendra Modi : मोदींनी दहा वर्षात मुलाखत दिली नाही. आता निवडणुकीत महाराष्ट्र आपल्या हातातून गेला हे लक्षात आल्यावर मुलाखत देण्याची पाळी आली.
Jayant Patil on Narendra Modi : "मोदींनी दहा वर्षात मुलाखत दिली नाही. आता निवडणुकीत महाराष्ट्र आपल्या हातातून गेला हे लक्षात आल्यावर मुलाखत देण्याची पाळी आली. यातच शरद पवार यांचा विजय आहे असे मला वाटत", अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पीएम मोदींवर (Narendra Modi) केली. यावेळी जयंत पाटील यांनी पीएम मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.
बाळासाहेबांच्या चिरंजीवांशी चर्चा करायला हवी होती
जयंत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे शत्रू नाहीत तर, त्यांचा पक्ष का फोडला? बाळासाहेबांचं कर्ज जर हे उतरू शकत नव्हते, तर त्यांनी मग आधी बाळासाहेबांच्या चिरंजीवांशी चर्चा करायला हवी होती. त्यांचा पक्ष फोडून मग त्यांना सहानुभूती का दाखवत आहेत? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.
दहा वर्षात पहिलीच मुलाखत दिली
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, सर्व महाराष्ट्राची सहानुभूती ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठीशी आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे जे वादळ महाराष्ट्रात सुरू झालं आहे. हे वादळ शांत करण्यासाठी दहा वर्षात पहिलीच मुलाखत नरेंद्र मोदी यांनी दिली असं मला वाटतं. उद्धव ठाकरेंसाठी खिडकी उघडी आहे, हा संभ्रम तयार करण्याचा त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रयत्न आहे. पण .. उद्धव ठाकरे आणि आम्ही काल एकत्र होतो, आम्ही सगळे सोबत आहोत. मात्र जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं हा त्याचा शेवटचा प्रयत्न आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितले.
पीएम मोदी काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर त्यांच्या मदतीला पहिल्यांदा धावून जाईन. अडचणीत उद्धव ठाकरे यांना मदत करणारा मी पहिला असेन, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजारपणात रश्मी वहिनींना रोज फोन करुन त्यांची विचारपूस केली होती, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पीएम मोदींच्या या दाव्यावर जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील जनता फारशी किंमत देत नाही
मी इस्लामपूरहून पुण्यात आलो आणि ते विमान अंधारे यांना घेण्यासाठी गेलं. त्यानंतर त्यांचा अपघात झाला. संजय निरुपम यांच्या प्रवेशला महाराष्ट्रातील जनता फारशी किंमत देत नाही. कोण कशासाठी कुठे जात आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या