(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayant Patil on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांवर प्रश्न विचारताच, जयंत पाटील म्हणाले, मला बावनकुळेंची जास्त काळजी वाटते
Jayant Patil on Devendra Fadnavis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आज (दि.6) महाराष्ट्रात विजयी झालेल्या खासदारांचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता.
Jayant Patil on Devendra Fadnavis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आज (दि.6) महाराष्ट्रात विजयी झालेल्या खासदारांचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार फटकेबाजी केली. जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत प्रश्न विचारला असता मला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची काळजी वाटते, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
8 जागांवर महाराष्ट्रातील जनतेने घवघवीत यश दिले
जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांच्या नेतृत्वात 10 जागा लढवल्या, त्यातील 8 जागांवर महाराष्ट्रातील जनतेने घवघवीत यश दिले. सर्व पक्षांनी एकसंघपणाने काम केलं. 30 ते 31 जागा महाविकास आघाडीच्या विचारांच्या आल्या आहेत. आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्व विजयी उमेदवारांना बोलवण्यात आले होते. आज 6 नवनिर्वाचीत खासदारांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. मात्र, आज त्यांचा राष्ट्रवादीच्या कार्यालयात सत्कार करण्यात येत आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रासह हरियाणातही सभा घेतल्या, त्यामुळेच महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे.
अमोल कोल्हे खासदार होते, बाकी सर्व नव्यानेच पहिल्यांदाच खासदार झाले
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, मी महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. शिवाय आमच्या मित्र पक्षांचेही आभार मानतो. महाराष्ट्रातील लोकांची मनस्थिती बदलली आहे. आमच्यासोबत जे बसलेत त्यापैकी अमोल कोल्हे खासदार होते, बाकी सर्व नव्यानेच पहिल्यांदाच खासदार झाले आहेत. महाराष्ट्रात निवडणूक होईल, तेव्हा अनेक नवीन चेहरे, नवीन तरुण समोर येतील. शरद पवारांमध्ये ते सामर्थ्य आहे. आम्ही स्वच्छ, पारदर्शी आणि लोकांना मान्य असणारेच उमेदवार देऊन पुढील निवडणुकीत सामोरे जाणार आहोत. त्यामुळे आम्ही प्रत्येकाची योग्य पद्धतीने तपासणी करणार आहोत, असंही जयंत पाटील म्हणाले. मी काल उद्धव ठाकरेंना भेटून आलो. त्यांच्या आणि पवार साहेबांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील चित्र बदलले आहेत. महाराष्ट्रात 2024 साली महाविकास आघाडीचे सरकार आणायचे, या जिद्दीने ते काम करत आहेत. ते एनडीएमध्ये जाणार नाहीत. रोहित पवारांना काही आमदार संपर्क करत असतील, त्याबद्दल त्यांनी भाष्य केलं असेल. मी याबाबत काही बोलणार नाही, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारपेक्षा महाराष्ट्र सरकारबद्दल लोकांची प्रचंड नाराजी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या