Jayant Patil: छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा, तुमच्याशी संपर्क केला का? जयंत पाटील म्हणाले...
Jayant Patil: जुनी कटुता राहण्याचे काही कारण नाही. आम्ही आता भाजपसोबत आहोत त्यामुळे जुनी कोणतीही सल नाही, असे सुनील तटकरे म्हणाले.
नाशिक : नाशिक (Nashik Lok Sabha) अजित पवारांसोबत (Ajit Pawar) शरद पवाराची (Sharad Pawar) साथ सोडून गेलेले अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याची चर्चा आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) भाष्य केलंय. भुजबळ नाराज असल्याचे ऐकलं मात्र माझ्याशी कोणी संपर्क केला नसल्याचं जयंत पाटलांनी सांगितलंय. ते नाशकात बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, छगन भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकलं.बाकीचे कोण नाराज आहे हे मला माहित नाही. माझ्याशी कोणी संपर्कात नाही. भाजपला दोन पक्ष फोडून देखील त्यांना जनाधार मिळत नाही म्हणून आणखी पक्ष घेत आहे. पक्ष जेवढे एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे तेवढा जनाधार कमी होईल. पक्ष एकत्र करण्याचा काही फायदा होणार नाही.
बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड फक्त उद्धव ठाकरे : जयंत पाटील
बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड फक्त उद्धव ठाकरेच आहेत, राज ठाकरे होणार नाहीत. उद्धव ठाकरे म्हणाले ते योग्य म्हणाले, 4 जूननंतर निकालानंतर लोक आपला निर्णय घेतील, असेही जयंत पाटील म्हणाले.
भुजबळांची नाराजी ही फक्त जागा वाटपापर्यंत होती: सुनिल तटकरे
छगन भुजबळांच्या नाराजीविषयी बोलतानाा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, जुनी कटुता राहण्याचे काही कारण नाही. आम्ही आता भाजपसोबत आहोत त्यामुळे जुनी कोणतीही सल नाही . छगन भुजबळ हे नाशिकच्या प्रचारात सक्रिय नाहीत यात काही तथ्य नाही. भुजबळ आणि त्यांची यंत्रणा सध्या सक्रिय आहे. भुजबळांची नाराजी ही फक्त जागा वाटपापर्यंत होती त्यानंतर काही प्रश्न नाही. अजित पवार पण प्रचारात सक्रिय होणार असून आज ते नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात उपस्थित राहणार आहेत.
गोडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा
महायुतीच्या जागावाटत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक… नाशिकच्या जागेवर कुणाला उमेदवारी दिली जाणार? याबाबत महायुतीत वारंवार खलबतं झाली. छगन भुजबळांचे नाव देखील चर्चेत होते. अखेर शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आली . गोडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभेच्या जागेसाठी युतीच्या प्रचारापासून दूर राहिले आहेत. महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री भुजबळ यांनी गोडसे यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे.
हे ही वाचा :