Jayant Patil on Abhijeet Patil : विठ्ठल कारखाना सील करणे म्हणजे विठ्ठलालाच सील करण्याचे सरकारचे धाडस, अभिजीत पाटील भाजपात प्रवेश करतील : जयंत पाटील
Jayant Patil on Abhijeet Patil, Pandharpur : विठ्ठल सहकारी साखर कारखाना स्व. अण्णांच्या छत्रछायेखाली अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होता. मधल्या काळात कारखाना संकटात आला.
Jayant Patil on Abhijeet Patil, Pandharpur : "विठ्ठल सहकारी साखर कारखाना स्व. अण्णांच्या छत्रछायेखाली अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होता. मधल्या काळात कारखाना संकटात आला. विठ्ठल कारखाना सील करणे म्हणजे विठ्ठलालाच सील करण्याचे सरकारचे धाडस आहे. अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांच्या पॅनलला तुम्ही निवडून दिले तेव्हा त्यांनी कारखान्याचे काम चांगले चालवले. आता त्यांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार सुरू आहे. माहिती मिळत आहे की, ते एक दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करतीलठ, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज करकंब पंढरपूर येथे सभा पार पडली. यावेळी जयंत पाटील बोलत होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील भाजप प्रवेश करत असल्याची माहिती स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे.
नियोजनाचा अभाव या सरकारमध्ये आहे
जयंत पाटील म्हणाले, या पंढरपूरने नेहमीच पवार साहेबांना साथ दिली आहे. यंदा पवार साहेबांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मला विश्वास आहे की तुम्ही त्यांना बहुमताने निवडून द्याल. कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा विषय असो, उजनीच्या पाण्याचा विषय असो विजय दादा नेहमीच प्रयत्नशील राहिले. यंदा पाण्याचे नियोजन झाले नाही. पाण्याचे योग्य नियोजन केले असते तर आपल्याला टँकरची गरज भासली नसती. आज एप्रिल महिन्यातच ही परिस्थिती आहे. पुढे मे महिना आहे. पाऊस वेळेवर आला तर ठीक नाही तर हे तीन चार महिने कसे काढायचे? नियोजनाचा किती अभाव या सरकारमध्ये आहे हे यातून दिसते. अनेक ठिकाणी यांनी प्रशासन व्यवस्थित चालवण्याऐवजी काही स्थानिक मुठभर लोकांच्या हट्टाला बळी पडून चुकीचे निर्णय घेतले.
शशिकांत शिंदे यांना अटक करण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अटक करण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. ती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तिथेच लढण्याची हिंमत दाखवा. जर त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक चार पट मतांनी निवडून येतील. मतितार्थ असा की, संपूर्ण हुकूमशाही सुरू आहे. आता तुमच्या खांद्यावर महाविकास आघाडीची मदार आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Abhijeet Patil: माढ्यातील मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांचा डबल धमाका, शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याला गळाला लावलं