एक्स्प्लोर

Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं

Jayant Patil: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीपूर्वी जयंत पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. अवघ्या काही दिवस आधी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांचीही मुंबईत भेट घेतली होती.

Jayant Patil: सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांचे पद रद्द करण्याच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी काल (16 जुलै) मलगुंडे बंधूंसह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीबाबत स्वतः जयंत पाटील यांनी ट्विट (X) करून सविस्तर माहिती दिली आहे.

जुने प्रकरण पुढे करून पद रद्द; जयंत पाटलांची शिंदेंकडे धाव

जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "माझ्या ईश्वरपूर मतदारसंघातील उरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे तब्बल 7 हजार 200 मताधिक्याने जनतेतून थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी ईश्वरपूर शहरातील अनेक प्रलंबित आणि विधायक विकासकामांना गती देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले आहेत." "मात्र, लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांचे कुठलेतरी जुने अतिक्रमणाचे प्रकरण पुढे आणून त्यांचे नगराध्यक्ष व नगरसेवक पद रद्द ठरवण्यात आले आहे. हा निर्णय लोकभावनेचा आदर करणारा नाही. त्यामुळे या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आणि वस्तुस्थिती सरकारसमोर मांडण्यासाठी मी स्वतः आनंदराव मलगुंडे व सुनील मलगुंडे यांच्या समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली," अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.  

महायुतीमधील नेत्यांच्या भेटीचा सिलसिला

मुंबईतील 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड भेट घेतली होती. याच वेळी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील फडणवीसांना भेटायला पोहोचल्याने राजकीय भूवया उंचावल्या होत्या. फडणवीस यांच्या भेटीच्या अवघ्या काही दिवस आधी जयंत पाटील यांनी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांचीही मुंबईत भेट घेतली होती. एकाच आठवड्यात भाजपच्या दोन अत्यंत वजनदार नेत्यांची (पहिले विनोद तावडे आणि नंतर देवेंद्र फडणवीस) जयंत पाटील यांनी घेतलेली भेट ही केवळ योगायोग मानली जात नाही. अजित पवार गटातील नेत्यांसोबत जयंत पाटील यांच्या थेट औपचारिक बैठका झालेल्या नसली, तरी विधानभवनातील एका खोलीत अजित पवार गटाच्या काही आमदारांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्याची मोठी चर्चा झाली होती.

शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होण्याची चर्चा आहे. मतदारसंघ पुर्नरचना विधेयकाला पाठिंबा देण्याचे सुतोवाच पक्षाकडून करण्यात आले आहेत. दुसरीकडे, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू असलेल्या जयंत पाटलांच्या भेटीगाठी पाहता एनडीएसोबत जाण्याच्या चर्चेला आणखी बळकटी मिळाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget