एक्स्प्लोर

Jalgaon Lok Sabha: मित्राचे तिकीट कापल्याने पक्ष सोडला, उन्मेष पाटलांसोबत ठाकरे गटात प्रवेश, कोण आहेत जळगावचे उमेदवार करण पवार?

Jalgaon Lok Sabha :  करण पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने जळगाव लोकसभा मतदार संघात ठाकरे गट विरुद्ध भाजपची चुरशीची लढत होणार आहे. जाणून घ्या कोण आहेत करण पवार...

 जळगाव:  महाविकास आघाडीकडून (MahaVikas Aghadi) जळगाव लोकसभेसाठी (Jalgaon Lok Sabha)  पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार (Karan Pawar)  यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. करण पवार यांना उमेदवारी देऊन शिवसेना उबाठा गटाने भाजपला (BJP) जोरदार धक्का दिला आहे. करण पवार  हे भाजपने तिकीट कापलेल्या विद्यमान  खासदार उन्मेश पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. खासदार  उन्मेष पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर करण पवार हे देखील नाराज झाल्याने त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.  करण पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने जळगाव लोकसभा मतदार संघात ठाकरे गट विरुद्ध भाजपची चुरशीची लढत होणार आहे.यानिमित्त जाणून घेऊयात करण पवार यांची राजकीय कारकीर्द...

कोण आहेत करण पवार? (Who is Karan Pawar)

  • वीस वर्ष आमदार असलेले आजोबा भास्कर राजाराम पाटील यांचे नातू 
  • काका डॉ. सतीश भास्कर पाटील माजी मंत्री आहेत
  • 2009 ला राष्ट्रवादी कडून नगर सेवक म्हणून निवडून आले
  • 2014  मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले 
  • सध्या पारोळा येथे विद्यमान नगराध्यक्ष आहेत
  • भाजप खासदार उन्मेष पाटील यांचे निकटवर्तिय मानले जातात
  • उन्मेष पाटील आणि करण पवार हे दोघे जवळचे मित्र मानले जातात. 

भाजपसाठी मोठा धक्का 

विद्यमान खासदार  उन्मेष पाटील आणि पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार या दोघांनी आज उद्धव ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे.  भाजपा सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण देशभरात अन्य पक्षातून भाजपमध्ये अनेक बडे नेते प्रवेश करत असताना भाजप सोडून या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने 
 राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. करण पवार हे लोकसभा मतदार संघातील लढतीचे गणित बदलवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

करण पवारांनी घेतली होती शरद पवारांची भेट (Karan Pawar Joins Shiv Sena Uddhav Thackeray Group)

करण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांनी त्यांच्या उमेदवारीला सकात्मकता दर्शविली होती. हा मतदार संघ ठाकरे गटाकडे असल्याने त्यांच्याकडून उमेदवारीबाबत करण पवार यांनी निर्णय घेण्याचे सूचविले आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : उन्मेष पाटलांच्या हाती शिवबंधन! तिकीट कापलेले भाजप खासदार ठाकरे गटात दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 PM : 29 January 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 Jan 2025 : ABP MajhaEknath Shinde PC : बालेकिल्ल्यातच भाजपकडून आव्हान? एकनाथ शिंदे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget