एक्स्प्लोर

Jain Muni Nilesh Chandra : आम्हीच आमदार, खासदार उभे करू अन् मोदींकडे जाऊ; BMC निवडणुका लढण्यावरतीही दिलं स्पष्ट उत्तर, जैन मुनी निलेश चंद्र नेमकं काय म्हणाले?

Jain Muni Nilesh Chandra : तर निवडणुका आल्या की, त्यांना मुद्दे येतात. त्याआधी त्यांच्याकडे मुद्दे येत नाहीत, नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर सगळं काही थंड होऊन जाणार आहे, असंही जैन मुनी निलेशचंद्र यांनी म्हटलं आहे.

मुंबई: दादरमधील कबुतरखान्यावरून मागील काही दिवसात चांगलाच वाद पेटला आहे. कबुतरखान्याच्या बंदीविरोधात शस्त्र हाती घेण्याचा इशारा देणारे जैन मुनी निलेशचंद्र यांनी त्यावेळी आपलीसंतप्त भूमिका व्यक्त केली होती, कबुतरखाना, मराठी, मारवाडी, या सर्व गोष्टींसह इतर आगामी निवडणुकीमध्ये जैन समाज उतरणार का? याबाबत जैन मुनी निलेशचंद्र यांनी एबीपी माझाच्या माझा महाकट्ट्यावरती सविस्तरपणे भाष्य केलं आहे.  येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही उतरणार का? या प्रश्नावर बोलताना जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले, हो मी पूर्ण भारतामध्ये प्रचार करेल, प्रत्येक समाजाची पार्टी आहे. तर जैन समाजाची पार्टी का नाही, आम्हाला काही गोष्टींसाठी इकडे-तिकडे पळायला लागतं. रस्त्यावर उतरायला लागतं. आम्ही शांत प्रिय समाज आहे. आम्ही कोणाच्याही लफड्यात पडत नाही. भांडणात पडत नाही. ज्या वेळी विदर्भात पूर आला त्यावेळी दोन करोड रुपये मी पाठवले तिकडे, देवेंद्र फडणवीस यांना आम्ही चेक दिला होता, महाराष्ट्राच्या जनतेसाठी दिला होता ना, असे पुष्कळ उदाहरण आहेत, महाराष्ट्रात पूर आला होता तेव्हा माझ्या बोलण्याने बाबूलालजी बन्साली आहेत, त्यांनी महाराष्ट्रभरात पैशांची मदत केली होती, या गोष्टी पुढे काय नाही येत, जे लोक जातीच्या नावावर, भाषेच्या नावावर राजनीती करतात ते फक्त बरसाती मेंढक आहेत असंही जैन मुनी निलेशचंद्र यांनी म्हटलं आहे. तर निवडणुका आल्या की, त्यांना मुद्दे येतात. त्याआधी त्यांच्याकडे मुद्दे येत नाहीत, नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर सगळं काही थंड होऊन जाणार आहे, असंही जैन मुनी निलेशचंद्र यांनी म्हटलं आहे. 

Jain Muni Nilesh Chandra : जे लोक जातीच्या नावाने प्रचार करतील त्यांना तसा प्रसाद द्या

तुम्ही बीएमसी लढणार का? या प्रश्नावर बोलताना जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले, हा...हा लालबाग आहे ना, इथले सर्व मारवाडी त्रस्त आहेत. बीएमसीची रोज गाडी येते, सर्वांना फोन लावतो साहेब आमच्या मारवाडीचा बघा काहीतरी झालं ते तोडलं, फोडलं. पण ते म्हणतात महाराज तुम्ही आम्हाला मतदान दिलं का? मग आम्ही कशाला येऊ, तुम्ही ज्यांना मतदान दिलंत त्यांना बोलवा, ते लोक त्यांचे काम करत नाहीत, आता मी सांगितलं आहे, लोकं विचार करतात, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. आता जे लोक जातीच्या नावाने प्रचार करतील त्यांना तसा प्रसाद द्या, तो कोणी असो, कोणत्याही धर्माचा असू द्या, तो जैन मुनी का असेना, त्याला पण तुम्ही प्रसाद द्या, संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलेला आहे, असंही जैन मुनी निलेशचंद्र यांनी म्हटलं आहे. 

Jain Muni Nilesh Chandra : आम्ही आमचे आमदार, खासदार उभे करू

आतापर्यंत अशी धारणा होती की भाजप जैन समाजाचा पक्ष आहे, यावर बोलताना जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले, नाही ही खोटी गोष्ट आहे, ते सनातन सोबत होते म्हणून जैन त्यांच्यासोबत होते, आमचा कोणताही पक्ष नाही, प्राणीमात्रांचा जीव वाचवणं हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, यामुळेच मी एकनाथ शिंदेंना मानतो, त्यांनी गोमाताला राजमाता म्हणून दर्जा दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, आम्हाला आमच्या धर्मासाठी लोकांकडे जावं लागते, त्यासाठीच आम्ही आमचे आमदार, खासदार उभे करू, आमचाच आम्ही ठरवू आणि जाऊ मोदींकडे, आमच्या समस्या आहेत म्हणून, चार महिने झाले मी कबुतरांसाठी बघतो आहे, ना देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला, ना एकनाथ शिंदे यांचा फोन आला, ना राज ठाकरेंचा आला, नेते काय म्हणतात तुम्ही आमच्याकडे भेटायला या, जोपर्यंत माझा निर्णय घेत नाही, तोपर्यंत मी कोणाकडे जाणार नाही, आमच्या वोट बँकेचा हे लोक चुकीचा वापर करत आहेत, त्याच जैन समाजाला एक चांगली दिशा देण्याचा एक कर्तव्य जैन मुनीचं आहे, असंही पुढे जैन मुनी निलेशचंद्र यांनी म्हटलं आहे. 

Nilesh Chandra On Devendra Fadnavis : गद्दार नेत्याला सोडणार नाही

जैन मुनी निलेश चंद्र म्हणाले की, "जैन समाज हा हजारो वर्षे प्राचीन धर्म आहे. कुणाची मंदिरं किंवा घरे पाडून जैन समाजाने जैनालय बांधलं नाही. हा जैन समाज शांतिप्रिय समाज आहे. पण आमचे विलेपार्लेचे मंदिर बुलडोझरने पाडलं, मग अवैध मशिदी पाडल्या का? दोन नेते मला भेटायले आहे, 15 दिवसांनी आम्ही तोडगा काढतो म्हणाले, पण तो निघाला नाही.  देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे जे गद्दार नेते आहेत, जे समाजाला तोडत आहेत त्यांची खैर नाही. माझे प्राण गेले तरी चालतील, पण त्यांना मी सोडणार नाही."देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा जो संदेश दिला तो मी दिला आहे. जो हिंदी हिताची गोष्ट करेल, त्याला आम्ही समर्थन देऊ असं निलेश चंद्र म्हणाले. 

Nilesh Chandra On MNS : तुम्ही फक्त मारवाडी समूदायाच्या विरोधात

दादरच्या कबुतरखान्याविरोधात आक्रमक झालेल्या मनसे नेत्यांना आणि ठाकरे बंधूंनाही जैन मुनी निलेश यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "तुम्हाला जर मराठीबद्दल प्रेम असेल तर तुम्ही भेंडी बाजारमध्ये जा, मुस्लिम परिसरात जा आणि बघा. मुंब्र्यात एका वर्षात शंभर कबरी उभ्या झाल्या, बांग्लादेशी तिकडे राहतात, त्याची तुम्हाला चिंता नाही. तुम्ही फक्त मारवाडी समूदायाच्या विरोधात बोलता."

प्रत्येक समाजाचा पक्ष आहे, पण जैन समाजाचा वेगळा पक्ष नाही. आमच्या समाजाच्या प्रश्नांवर आम्हाला इकडे तिकडे जावं लागतं. त्यामुळे आम्हीही आमचा पक्ष स्थापन करू असं निलेश चंद्र म्हणाले. हे राजकीय लोक आहेत ते जाती आणि भाषेच्या नावावर भेदभाव करतात. निवडणुका आल्यावर या गोष्टी होतात. महापालिका निवडणूक झाल्यावर हे सगळे शांत बसतील. 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदे सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदे सेनेचा स्पष्ट संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदे सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदे सेनेचा स्पष्ट संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
Embed widget