एक्स्प्लोर

Dahi Handi : जय महाकाली पथकाने फोडली हिवरी नगर येथील 'महागाईची हंडी', पथकाला 2 लाख 22 हजार 222 रुपयांचा रोख पुरस्कार

महागाईमुळे मध्यमवर्गीय कुटुंब, मजूरी करणारा वर्ग यांच्यावर होणारा अत्याचार समाजापुढे आणण्याच्या उद्देशाने महागाईच्या हांडीचे आयोजन करण्यात आले होते.

नागपूर:  हिवरीनगर येथे आयोजित 'महागाईची हंडी' जय महाकाली पथकांनी फोडली. वाढत्या महागाईवर लक्ष वेधण्यासाठी हिरवी नगर येथे ही दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केले होते. यामध्ये विजेत्या पथकाला 2 लाख 22 हजार 222 रुपयांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या दहीहंडी स्पर्धेत आदिशक्ती क्रीडा मंडळ, जय मा शितला मंडळ, जय भोलेश्वर मंडळ, जय महाकाली क्रीडा मंडळ, व राधाकृष्ण महिला मंडळाचे गोविंदा पथक सहभागी झाले होते. या स्पर्धेत आकर्षक मानवी मनोरे रचत जय महाकाली मंडळांनी  महागाईची दहीहंडी फोडली. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाने, आमदार अभिजीत वंजारी, शेखर सावरबांधे, संदीप इटकेलवार, श्रीकांत घोगरे, ईश्वर बाळबुदे, तानाजी वनवे, वर्षा शामकुले, रमन ठवकर, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या गोविंदा पथकाला पुरस्कार देण्यात आले.

देशभरातील जनता महागाईचे चटके सहन करत आहेत. गृहीणींचे बजेटही बिगडले आहे. महागाईवर सरकारचे नियंत्रण नसून सरकार फक्त कर वाढवून नागरिकांची लूट करत आहे. सरकारने नुकतेच लादलेल्या जीएसटीमुळे सामान्य नागरिकाला पुन्हा महागाईची कळ लागली आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. याविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याचे प्रतिबिंब म्हणून आम्ही 'महागाईची हंडी' आयोजित केली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी सांगितले.

राधाकृष्ण महिला मंडळाला आकर्षक पुरस्कार

तसेच राधाकृष्ण महिला मंडळाच्या पथकाला लक्ष्मीकांत सावरकर यांच्यातर्फे आकर्षक पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राविनिश पांडे, प्रशांत बनकर, रियाज़ शेख आकाश थेटे, विनोद निनावे,सुनील मस्के, प्रकाश मेश्राम, राहुल  नारनवरे,अश्विन जवेरी, कपिल आवारे, अमित जेठे, पवन गावंडे, निलेश बोरकर, शरद शाहू, अमरीश ढोरे, रुपेश बागडे, विलास पैठणकर, गणेश आटे, कपिल शराफ, लोकेश सतीबावणे, राजेंद्र भोयर, मिलिंद वाचनेकर, राजेश पाटील, प्रकाश उपाध्यय, देवेंद्र गरडे, अनंत रंगारी, अनिल शेख,प्रशांत वांधरे, जय चावला, दीपक सलुजा, इकबाल शेख,  अफजल शेख, नरेंद्र साळवे, सुशांत पाली, आशुतोष बेलेकर,वसीम लाला, सचिन बोरकर, राहुल पेठे,  राजू मोरे, पिंटू मेश्राम, आकाश चिमणकर, या कार्यक्रम या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

" घर चालविण्यासाठी घरातील प्रमुख दिवसरात्र परीश्रम घेत असतात. कुटुंबाला कुठल्याही गोष्टीची उणीव भासू नये म्हणून आपली इच्छा विसरुन मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात. याची जाणीव तरुणांना व्हावी आणि या महागाईमुळे मध्यमवर्गीय कुटुंब, मजूरी करणारा वर्ग यांच्यावर होणारा अत्याचार समाजापुढे आणण्याच्या उद्देशाने महागाईच्या हांडीचे आयोजन करण्यात आले होते. देशातील युवक आता जागे झाला असून आता सत्तेच्या मग्रुरीत असलेल्या सरकारला त्याची जागा दाखवणार असल्याचे कालच्या गर्दीतून स्पष्ट दिसून येत आहे. "
-दुनेश्वर पेठे,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  शहर अध्यक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget