एक्स्प्लोर

EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला

लोकसभा निवडणूक आणि गत काही वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकानंतर विरोधकांनी ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित केल्या होत्या.

नवी दिल्ली: देशाच्या 18 लोकसभा निवडणुकीसाठीचा निकाल 4 जून रोजी सर्वत्र जाहीर झाला. अब की बार, 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत (Election) बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र, एनडीए आघाडीने 294 जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा बहुमत मिळवले आहे. त्यामुळे, राजधानी दिल्लीत आज एनडीए आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत एनडीतील सर्वच घटकपक्षांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) तिसऱ्यांदा एनडीएचा घटकपक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे, आता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करणार आहेत. तत्पूर्वी आज केलेल्या भाषणातून देशासाठी पुढील 10 वर्षांचं लक्ष्य ठेवून काम करणार असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच, निवडणूक निकालावर भाष्य करताना इंडिया आघाडीवरही जोरदार हल्लाबोल केला. EVM मशिन्सवरुन सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांनाही चिमटा काढला. 

लोकसभा निवडणूक आणि गत काही वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकानंतर विरोधकांनी ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित केल्या होत्या. भाजपला मिळालेल्या यशानंतर पराभूत पक्षातील काही नेत्यांनी ईव्हीएममध्ये घोळ असल्याचं सांगत बॅलेट पेपरवरही मतदान घेण्याची मागणी केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं, तर राज्यातही महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणूक निकालानंतर ईव्हीएमवर शंका घेणारं विधान किंवा ईव्हीएम घोटाळ्यावर कुठंही भाष्य करण्यात आलं नाही. नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातूनही हाच मुद्दा उपस्थित केला. 

ईव्हीएमने विरोधकांना गप्प केले

4 जून रोजी निकाल लागला, मी माझ्या कामात व्यग्र होतो. पण मी एका माझ्या सहकाऱ्याला विचारलं की देशात ईव्हीएम जिंवत आहे का, की ईव्हीएम मरुन गेले आहे. भारताच्या लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास उडावा यासाठी विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आला. विरोधक ईव्हीएम मशिनवर टीका करायचे. मला तर वाटलं होतं, निकालानंतर ते ईव्हीएमची तिरडी काढतील. पण 4 जून रोजी संध्याकाळपर्यंत ईव्हीएमने विरोधकांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची, निवडणूक आयोगाची ताकद आहे, असे म्हणत मोदींनी ईव्हीएमच्या मुद्दयावरुन विरोधकांना लक्ष्य केले.  

भारताची जगात बदनामी करायचा कट

2029 साली ते पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनला घेऊन टीका करायाला सुरुवात करतील. निवडणुकीच्या काळात प्रत्येक तीन दिवसांनी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा यावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा कसा आणता येईल, यासाठी प्रयत्न केले. निवडणूक आयोगावर आरोप करायचा, निकाल काहीही लागू देत भारताची जगात बदनामी करायची, असा विरोधकांनी कट रचला होता. देश त्यांना कधीही माफ करणार नाही, असेही मोदींनी म्हटले. हे 

बाळासाहेब ठाकरेंची आठवण

मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटले की, NDA घटकपक्षाचे सर्व नेते, नवनिर्वाचित खासदारांचं मी हृदयापासून आभार मानतो. माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की इतक्या मोठ्या समुहाचं स्वागत करण्याची संधी मला मिळाली. जे खासदार निवडून आले आहेत ते अभिनंदनाचे अधिकारी आहेत. पण, ज्या लाखो कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत करुन, इतक्या भंयकर गर्मीत परिश्रम घेतलं त्या सर्व कार्यकर्त्यांना या संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमधून डोकं टेकून त्यांना वंदन करतो, असे म्हणत मोदींनी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले.  जे राजकीय तज्ज्ञ आहेत, जर त्यांनी मुक्त मनाने विचार केला तर एनडीए हे सरकार मिळवण्याचा किंवा सत्ता टिकवण्यासाठी जमलेली टोळी नाही. तर देशसेवेसाठी कटिबद्ध असलेला हा समूह आहे. देशाच्या राजकारणातील ही ऑरगॅनिक अलायन्स आहे. आज श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शरद यादव, जॉर्ज फर्नांडिस असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांनी विश्वासाने बिजं रोवली त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. आमच्या सर्वांजवळ या महान नेत्यांचा वारसा आहे त्याचा आम्हाला गर्व आहे, असेही मोदींनी भाषणात म्हटले.

पुढे बोलताना मोदींनी म्हटले की, तुम्ही सर्व सदस्यांनी माझी नेतेपदी निवड करुन माझ्यावर नवी जबाबदारी दिली आहे. मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभार आहे. व्यक्तिगत जीवनात मी जबाबदारीची जाणीव ठेवतो. 2019 मध्ये या सभागृहात मी बोलत होतो, ज्यावेळी माझी नेतेपदी निवड केली होती त्यावेळी म्हणालो होतो 'विश्वास'.. आज मी परत म्हणतो, माझ्यावर जे दायित्व दिलं आहे, त्याचं कारण आपला एकमेकांप्रती विश्वास आहे. आपलं अतूट नातं विश्वास मजबूत करतं, हेच सर्वात मोठं वैभव आहे. त्यासाठी हा क्षण माझ्यासाठी भावूक करणारा आहे, आणि तुमच्या सर्वांचं जेवढे आभार मानू तितकं कमी आहे. 

10 पैकी 7 राज्यात एनडीए

हिंदुस्थानाच्या लोकशाहीची इतकी ताकद आहे. NDA ला देशातील 22 राज्यांत सरकार बनवून जनतेने सेवेची संधी दिली. आमची युती ही भारताचा आत्मा आहे, स्पिरीट आहे, त्याचं एक प्रतिबिंब आहे. त्यामुळेच मी म्हणतो आपल्या देशात आमच्या आदिवासी बंधूंची संख्या निर्णायक आहे. आदिवासींची संख्या जिथे जास्त आहे, अशा 10 राज्यापैकी 7 राज्यात एनडीए सेवा करत आहे. सहकाऱ्यांनो आम्ही सर्वधर्म समभावाच्या आमच्या संविधानाला समर्पित आहे. देशातील गोवा असो की नॉर्थ इस्ट इथे मोठ्या प्रमाणात आमचे ख्रिश्चन बंधू भगिनी राहतात. त्या राज्यातही एनडीएला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. 

एनडीएवर स्तुतीसुमनं

सहकाऱ्यांनो प्री पोल अलायन्स, हिंदुस्थानातील राजकीय इतिहासात, प्री पोल अलायन्स इतका यशस्वी कधीही झाला नाही जितका एनडीए झाला. हे गटबंधन किंवा युतीचा विजय आहे, असेही मोदींनी एनडीए आघाडीबाबत बोलताना म्हटले. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे. लोकशाहीचा हा सिद्धांत आहे. मात्र देश चालवण्यासाठी सर्वमत आवश्यक आहे. मी आज देशवासियांना विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही आम्हाला बहुमत देऊन सरकार चालवण्याची संधी दिली, आम्ही सर्वमतांचा आदर करु आणि देश पुढे नेण्यासाठी सर्व ते प्रयत्न करु.एनडीएला तीन दशकं पूर्ण झाली आहेत. ही सामान्य घटना नाही. तीन दशकं खूप मोठा काळ आहे, त्या काळात एनडीए एकत्र आहे. एनडीए ही सर्वात यशस्वी आघाडी आहे.पाच वर्षांचा कार्यकाळ असतो, आम्ही पाच पाच वर्षांचे तीन टर्म पूर्ण केले आहेत, आता हीच आघाडी चौथ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत.  दरम्यान, ग्रासरुटवर काम केल्यामुळे ऑरगॅनिक अलायन्स तयारी झाली. जिथे कमी तिथे आम्ही, जिथे कमी राहील, तिथे आम्ही एकत्र येऊन मेहनत करुन हे दाखवून दिलं. भारतातील प्रत्येक क्षेत्र असो, त्यांच्या इच्छा रिजनल आणि नॅशनल ध्येय याचं मजबूत नातं हवं, असे मोदींनी म्हटलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget