एक्स्प्लोर

हर्षवर्धन पाटलांचं टेन्शन वाढलं; दत्तात्रय भरणेंकडून स्वत:ची उमेदवारी जाहीर, ग्रामस्थांपुढे जोडले हात

Indpaur Vidhansabha: दत्तात्रय भरणे (dattatray bharne) यांनी एका गावात ग्रामस्थांशी बोलताना चक्क स्वत:ची उमेदवारीच जाहीर केल्याचं पाहायला मिळालं. मी तुमच्यासाठी काम केलंय

Indpaur Vidhansabha: पुणे : विधानसभा निवडणुकांचे वेध सर्वांना लागले असून नोव्हेंबर महिन्यात राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असल्याने अनेक मतदारसंघात जागावाटपात मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच, राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपचे स्थानिक नेते नाराज असून आपल्या मतदारसंघात भाजपलाच जागा सुटावी, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, महायुतीमध्ये विद्यमान आमदार ज्या पक्षाचा, त्या पक्षाला जागा असा फॉर्म्युला निश्चित मानला जात आहे. त्यातच, आता इंदापूरचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी स्वत:च आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, भाजपचे इच्छुक उमेदवार असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचं टेन्शन वाढलंय. 

दत्तात्रय भरणे (dattatray bharne) यांनी एका गावात ग्रामस्थांशी बोलताना चक्क स्वत:ची उमेदवारीच जाहीर केल्याचं पाहायला मिळालं. मी तुमच्यासाठी काम केलंय, मनापासून काम केलंय, तुम्हाला सभामंडप दिलं असेल, व्यक्तिगत कामासाठी माझा उपयोग झाला असेल तर मलाच आशीर्वाद द्या, असेही भरणे यांनी म्हटले. तुम्ही मामा आहात आणि तुम्हीच उमेदवार आहात, असे समजा या दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याने इंदापूरमध्ये (Indapur) महायुतीत खळबळ उडाली आहे. एकीकडे महायुतीचे जागावाटप झालं नाही, पण अजित पवारांनी इंदापूरची जागा ही विद्यमान अमादार दत्तात्रय भरणे यांना मिळणार असे संकेत दिले होते. त्यावर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता तर थेट दत्तात्रय भरणे यांनी तुम्हीच मामा आहात आणि तुम्हीच उमेदवार आहात असे वक्तव्य केल्याने इंदापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे भरणे यांनी हे वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार किंवा तुतारी हाती घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण अजित पवारांच्या वक्तव्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी मौन बाळगलं होतं. आता त्यांनीच स्वतःचीच उमेदवारी घोषित केली आहे, त्यामुळे आता इंदापूरमध्ये महायुतीत खळबळ उडाली असून हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता हर्षवर्धन पाटील नेमकी काय भूमिका घेतात, भाजपकडून त्यांची मनधरणी होते का, त्यांना संधी मिळते का, ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातात, हे चित्र पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल. 

हेही वाचा

अजितदादांच्या 'NCP'त ऑल इज नॉट वेल, चाकणकरांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी मोठ्या महिला नेत्याचा विरोध, म्हणाल्या, 'एकालाच किती...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Waghya Dog Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी, राजेंच्या मागणीनंतर ओबीसी समाज आक्रमकTop 50 Superfast News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 March 2025 : 6 PM : ABP MajhaSanjay Raut On Kunal Kamra News : मग मलबारहिलवर बुलडोझर फिरवा, कुणाला कामराच्या ऑफिस तोडफोडीनंतर राऊतांचा संतापABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 5PM 25 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Embed widget