एक्स्प्लोर

'तुम्ही कोणत्या गटात, तुमची भूमिका स्पष्ट करा', डोंबिवलीत शिवसेनेच्या शाखेत राडा

Shinde Group Vs Shiv Sena: 'तुम्ही कोणत्या गटात, तुमची भूमिका स्पष्ट करा', या कारणावरून डोंबिवलीच्या दीनदयाळ रोड येथील शिवसेना शाखेत शहर प्रमुख विवेक खामकर व पदाधिकार्यांमध्ये राडा झाला.

Shinde Group Vs Shiv Sena: 'तुम्ही कोणत्या गटात, तुमची भूमिका स्पष्ट करा', या कारणावरून डोंबिवलीच्या दीनदयाळ रोड येथील शिवसेना शाखेत शहर प्रमुख विवेक खामकर व पदाधिकार्यांमध्ये राडा झाला. या प्रकरणी विष्णू नगर पोलिस ठाण्यात शहरप्रमुख  विवेक खामकर यांच्या विरोधात मारहाण, शिवीगाळ, पैसे चोरल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी खामकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान विवेक खामकर यांची तीन दिवसांपूर्वी डोंबिवली शहर प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आले होते. तर याबाबत खामकर यांनी मात्र मी शाखेत गेलो होतो, शाखा प्रमुखाला मी सदस्य नोंदणीबाबत विचारलं, मात्र माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांनी आरोपांचा खंडन केलं. या घटनेमुळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापले आहे.

सध्या राज्यभरात शिंदे गट विरुद्ध शिवसेना अशा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच उद्धव ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही बाजूने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवाहने, भावनिक साद घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीत देखील या वादाचे पडसाद उमटले आहेत. काही नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे नुकतेच नियुक्त झालेले डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर शाखमध्ये भेट देत आहेत. 

शुक्रवारी डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाळ रोड वरील शिवसेना शाखेत खामकर काही कार्यकर्त्यांसह आले होते. यावेळी शाखेत शाखा प्रमुख परेश म्हात्रे ,पवन म्हात्रे हे होते. याबाबत परेश म्हात्रे म्हणाले की, ''खामकर काल शाखेत आले त्यांनी तुम्ही कोणत्या गटात, तुमची भूमिका स्पष्ट करा, असं आम्हाला विचारलं. तुम्ही सदस्य नोंदणीचे फॉर्म भरले नाहीत, असं सांगत वाद घालत शिवसेना शाखेवरील नेत्यांचे फोटो असलेला बॅनर काढून टाकले. आमच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर शाखेत असलेल्या काही महत्त्वाची कागदपत्र आणि रोख रक्कम पंधरा हजार रुपये घेऊन गेले.'' या प्रकारानंतर परेश मात्रे यांनी डोंबिवली पश्चिम येथील विष्णू नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी म्हात्रे यांनी डोंबिवली विष्णू नगर पोलीस स्टेशनमध्ये विवेक खामकर यांच्या विरोधात मारहाण, शिवीगाळ, पैसे चोरल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे. खामकर यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी शिवसेनेचे शहर प्रमुख विवेक खामकर यांच्याविरोधात गुन्हा दखल करत त्यांना अटक केली आहे. आज खामकर यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांनी घोषणा करुनही आमदारकीचा राजीनामा का दिला नाही?
राज्यपालांच्या वक्तव्यावर गुजराती-राजस्थानी व्यापाऱ्यांना नेमकं काय वाटतं? त्यांचे योगदान काय? इतिहास काय सांगतो? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Holidays In March 2025 : मार्चमध्ये सार्वजनिक सुट्टी किती दिवस? बँका किती दिवस बंद राहणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर
मार्चमध्ये सार्वजनिक सुट्टी किती दिवस? बँका किती दिवस बंद राहणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर
Nanded Gain bitcoin Cryptocurrency Scam: महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
Weather Update: उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Holidays In March 2025 : मार्चमध्ये सार्वजनिक सुट्टी किती दिवस? बँका किती दिवस बंद राहणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर
मार्चमध्ये सार्वजनिक सुट्टी किती दिवस? बँका किती दिवस बंद राहणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर
Nanded Gain bitcoin Cryptocurrency Scam: महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
Weather Update: उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
Embed widget