राज्यपालांच्या वक्तव्यावर गुजराती-राजस्थानी व्यापाऱ्यांना नेमकं काय वाटतं? त्यांचे योगदान काय? इतिहास काय सांगतो?
Bhagat Singh Koshyari controversial statement : मुंबई आर्थिक राजधानी गुजराती राजस्थानीमुळे झाली, यात या व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे आणि हे जर गेले तर सगळा मुंबईतील पैसे जातील असं त्यांनी म्हटलं. प
Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वक्तव्य केले आणि वादाला (Bhagat Singh Koshyari controversial statement) सुरुवात झाली. मुंबई आर्थिक राजधानी गुजराती राजस्थानीमुळे झाली, यात या व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे आणि हे जर गेले तर सगळा मुंबईतील पैसे जातील असं त्यांनी म्हटलं. पण खरंच गुजराती-राजस्थानी लोकांचा मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा प्राप्त करून देण्यात कितपत योगदान आहे ? आणि राज्यपाल यांच्या या वक्तव्यावर गुजराती-मारवाडी राजस्थानी व्यापार्यांना नेमकं काय वाटतं.
महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली, तेव्हा मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा प्राप्त होण्यासाठी मराठी माणसाचा स्थानिकांचा योगदान मोठं आहे. आता त्यात राजस्थानी गुजराती लोकांच्या योगदानाला सुद्धा नाकारता येणार नाही. पण फक्त हे योगदान राजस्थानी आणि गुजराती यांचच असल्यासारखं राज्यपालांच्या वक्तव्यावरून दिसतं. आणि म्हणूनच या वक्तव्याचे समर्थन गुजराती राजस्थानी व्यापारी सुद्धा करत नाहीत.
मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे, इथे प्रत्येक भाषिक जमातीचा व्यक्ती राहतो व्यापार करतो त्यामुळे या सगळ्यांचे योगदान आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे... राजस्थानी गुजराती व्यापारी उद्योगधंद्यात जरी असले तरी मराठी माणूस खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करतो. फक्त मराठीच नाही तर इतर समाजाचे व्यापारी सुद्धा एकत्रित येतात आणि त्यामुळेच आर्थिक राजधानीचा दर्जा मुंबईला प्राप्त होतो. आणि हे फक्त आताच नाही तर अगदी पूर्वीपासून जात पात समाज बाजूला ठेवून हे सगळे व्यापारी काम करतात.
आता हे सगळं पाहिल्यानंतर खरंच मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात योगदान कोणाचं ? मराठी माणसाचं की मग राजस्थानी गुजराती व्यापाऱ्यांचं ? योगदान कोण्या एका समाजाचे किंवा एका भाषिक लोकांचे नाही तर हे एकत्रित मिळून सगळ्यांचे योगदान आहे... त्यामुळे राज्यपालांनी केलेले हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचं असल्याचं या सर्व व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे... आणि म्हणूनच कोणीही याच समर्थन करत नाहीये.