एक्स्प्लोर

Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार

Maharashtra Politic: सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात आणि अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात जबाबदारी देण्याचा प्रस्ताव प्रफुल पटेल यांनी दिला होता. पण तो प्रस्ताव स्वीकारला नाही, या म्हणण्यात तथ्य नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

मुंबई: मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याबाबत कधीही मुलगी-पुतण्या असा भेद केला नाही. सुप्रिया सुळे आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणातच आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आले नाही. याउलट अजित पवार (Ajit Pawar) यांना कायमच सत्तापदे देण्यात आली, असे सांगत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजितदादा गटाकडून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांनी स्वत:च्या मुलीसाठी पुतण्या असलेल्या अजित पवार यांना डावलले, असा आरोप भाजप आणि अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जातो. दैनिक 'लोकसत्ता'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी या आरोपाला सविस्तर प्रत्युत्तर दिले. 

शरद पवार यांनी मुलाखतीमध्ये अजित पवार यांना पक्षाने कशाप्रकारे महत्त्वाची पदं दिली होती, याचा पाढा वाचला. अजित पवार यांना राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीनवेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्वकाही देण्यात आले. सुप्रिया सुळे यांना फक्त खासदारकी दिली असून त्या दिल्लीच्या राजकारणात आहेत. सुप्रिया यांना कधीही सत्तापद देण्यात आले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

अजित पवारांच्या भूमिकेची शरद पवारांकडून चिरफाड 

अजित पवार यांनी भाजपसोबत जाताना आणि अलीकडच्या काळात वारंवार विकास करण्यासाठी सत्ता कशाप्रकारे महत्त्वाची आहे, हे मतदारांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवार यांनी अजित पवार यांची ही भूमिका खोडून काढली. ते म्हणाले की, सत्तेत असल्याशिवाय जनतेची कामे करता येत नाहीत, दाव्यात तथ्य नाही. विरोधी पक्षनेत्याचे पद आणि विरोधी पक्षही लोकशाहीत कायम महत्त्वाचा असतो. माझ्या 56 वर्षांच्या कारकीर्दीत  मी केवळ 20 वर्षे सत्तेत होतो. उर्वरित काळ मी विरोध पक्षात घालवला. एस.एम. जोशी, कृष्णराव धुळप, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या नेत्यांनी विरोधी पक्षात राहून आपले स्थान निर्माण केले. बॅरिस्टर पै नाथ बोलायला उभे राहिल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरुही थांबून त्यांचे भाषण ऐकायचे. परंतु, राष्ट्रवादीचे काही नेते सत्तेविना राहू शकत नव्हते. त्यांनी पाच वर्षे विरोधात काढली होती. या मंडळींना भाजपसोबत जाण्याची घाई झाली होती. पण मी त्यांना सांगितले होते की, पाहिजे तर तुम्ही जा, मी येणार नाही. 

अमोल मिटकरींचा शरद पवारांना सवाल

शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर अजितदादा गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या जागा जास्त आलेल्या असतानाही शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिला नाही?, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. शरद पवारांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पक्षाकडे अनुभवी चेहरा नसल्याने तेव्हा मुख्यमंत्रीपदावर दावा केला नसल्याचं म्हटले होते. त्यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही सभागृहात कसल्याही कामाचा अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी कुणी पुढाकार घेतला?काँग्रेसने महाराष्ट्रावर लादलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना विरोध का झाला नाही? 2004 ला राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता की असलेल्या उमेदवाराला मुख्यमंत्री करायचेच नव्हते?, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा

अजित पवार पुन्हा गायब, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा; शरद पवारांनी दिलंय 'हे' उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget