एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला कसे तयार झाले? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Devendra Fadnavis on Eknath Shinde DCM: देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाचे आमदार, खासदार यांनी एकनाथ शिंदेंची मनधरणी केली आणि गुरूवारी अखेर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठीची चाचपणी सुरू झाली होती. महायुतीमध्ये मोठं संख्याबळ हे भाजपकडे असल्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट जवळजवळ स्पष्ट झालं होतं, त्यानंतर अजित पवार त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे देखील ठरलं होतं. महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये अजित पवारांनीच जाहीर केलं होतं. पण एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठी संदिग्धता आणि संभ्रम निर्माण झाले होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नाहीत अशी चर्चा होती. तर ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रीपदासाठी पक्षातील इतर नावांचा विचार करत होते अशी चर्चा देखील होती. मात्र शपथविधीच्या एक ते दिड तास आधी चित्र पालटलं, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना पक्षाचे आमदार, खासदार यांनी त्यांची मनधरणी केली आणि गुरूवारी अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) एकनाथ शिंदेंचं मन कसं वळवलं ते त्यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 

फडणवीसांनी कसं वळवलं मन

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी एबीपीला मुलाखत दिली त्यावेळी बोलताना ते म्हणाले, शपथविधीच्या आधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याच्या काही बातम्या समोर आल्या, पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज आहेत, एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  उपमुख्यमंत्री बनू इच्छित नाहीत, अशी कोणती परिस्थिती नव्हती. ज्यावेळी मी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं, मी पण इच्छुक नव्हतो, पण माझ्या पक्षाने मला ती जबाबदारी दिली, तेव्हा माझ्या लक्षात आलं सरकार चालवायचा असेल तर पक्षाचा जो मजबूत व्यक्ती आहे, त्याला अधिकार असतो. तो व्यक्ती सरकारमध्ये असेल तर पक्षही व्यवस्थित चालतो. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या गोष्टीला मान्यता दिली आणि ते तयार झाले, असे पुढे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)म्हणाले.

मी आधी मुख्यमंत्री होतो, पण शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केले तेव्हा मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. आधी मी त्यासाठी तयार नव्हतो, पण पक्षाने ती जबाबदारी घ्यायला लावली. तेव्हा मला हे पद घ्यायचे नव्हते, पण नंतर अडीच वर्षे सरकारमध्ये राहून मला खूप काही करता आले, सत्तेच्या बाहेर राहून ते करता आले नसते हे माझ्या लक्षात आले आणि शिंदे यांना मी नेमके हेच सांगितले, असं मुलाखतीवेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर पक्षातील तुमच्यासारखा मोठा नेता सरकारच्या बाहेर असणं चांगले नाही. पक्ष चालला पाहिजे आणि त्याचवेळी सरकारही चालले पाहिजे, असे मी शिंदे यांना सांगितले. त्यांच्या पक्षातील नेते त्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा आग्रह करत होते, त्यानंतर शिंदे तयार झाले असंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  पुढे म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

China Virus HMPV | चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहा:कार,ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस म्हणजेच HMPVचं थैमानGraphic Designer to Rikshawala| नोकरी गेली पण कमलेश कामतेकरने हार मानली नाही Special ReportSpecial Report Dhananjay Munde:धनंजय मुंडेविरोधात वेगळी भूमिका,एसआयटी अहवालानंतर राजीनाम्याचा निर्णयSpecial Report Marathi vs Hindi:मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद, मराठी तरुणावंर परप्रांतीयांचा हल्लबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Embed widget