एक्स्प्लोर

"ते स्वतः कमावतात थोडीच, आईवर ओझं आहेत..."; राहुल गांधींवर आसामच्या मुख्यमंत्र्यांची आगपाखड

Rahul Gandhi on Agniveer: आपल्या अनेक भाषणांमध्ये बोलताना राहुल गांधी सातत्यानं अग्नीवीर योजना बंद करण्यात यावी, असं म्हणाले आहेत. यावर आता भाजपनं राहुल गांधींना फैलावर घेतलं आहे. 

Lok Sabha Election 2024: नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) शेवटच्या टप्प्यातील प्रचार ऐन रंगात आलाय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारात अग्नीवीर योजनेचा मुद्दा प्रचंड गाजतोय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं (Congress) अग्निवीर योजनेवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या अनेक भाषणांमध्ये बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्यानं अग्नीवीर योजना (Agnipath Scheme) बंद करण्यात यावी, असं म्हणाले आहेत. यावर आता भाजपनं राहुल गांधींना फैलावर घेतलं आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधींनी आधी सैन्यात नोकरी करावी, लष्कराला समजून घ्यावं आणि त्यानंतरच अग्नीवीर योजनेबाबत बोलावं, असं भाजपनं म्हटलं आहे. काँग्रेस पक्षानं लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट आणि दारूगोळाही दिला नसल्याचं भाजपनं म्हटलं आहे. 

राहुल गांधी त्यांच्या आईवर ओझं : हेमंत बिसवा 

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, अग्निवीर योजनेंतर्गत लोकांना प्रथम सैन्यात नोकरी मिळेल आणि नंतर राज्य पोलिसांत नोकरी मिळू शकेल. तरुणांना ही योजना आवडते, त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येनं तरुण मुलाखती देण्यासाठी येत आहेत. राहुल गांधींवर निशाणा साधत ते म्हणाले की, "राहुल ना सैन्यात भरती होऊ शकतात, ना अग्निवीर होऊ शकतात. ते स्वत: काहीही कमवू शकत नाहीत आणि खाऊ शकत नाहीत. ते त्यांच्या आईवर ओझं आहेत. ते देशद्रोहाचं कृत्य करतायत. मी त्यांना ताकीद देतो की, सैन्याबद्दल काहीही चुकीचं बोलू नका."

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर बोलताना म्हणाले की, काँग्रेसनं देशात गोंधळ घालणं थांबवावं, काँग्रेसने बोफोर्स, जीप, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा केला. काँग्रेसने लष्कराला काहीही दिले नाही. लष्कराला वन रँक, वन पेन्शन दिली गेली नाही, तर मोदी सरकारने लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट, शस्त्रे आणि दारूगोळा दिला. अग्निवीर योजनेत 100 टक्के नोकरीची हमी आहे. 75 टक्के अग्निवीर सैनिक चार वर्षे सैन्यात राहतील आणि त्यानंतर त्यांना पोलीस विभाग आणि खासगी क्षेत्रात मागणी असेल, असं अनुराग ठाकूर म्हणाले आहेत. 

त्याचवेळी जनरल व्हीके सिंह म्हणाले की, मी राहुल गांधींना सल्ला देतो की, आधी सैन्यात सेवा करा आणि मग लष्कराबद्दल बोला. आधी सैन्य समजून घ्या मग बोला. त्याच्या टिप्पणीचा काही फायदा नाही.

अग्नीवीरबद्दल राहुल गांधी काय म्हणतात?

लोकसभा निवडणूक जिंकून इंडिया ब्लॉक सत्तेत आल्यास अग्निवीर योजना रद्द करून डस्टबिनमध्ये फेकून देऊ, असं काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्यानं सांगत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'भारतातील सैनिकांना मजुरांमध्ये रूपांतरित केलंय', अशी टीकाही केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं 2022 मध्ये तीनही सेवांमधील वयोमर्यादा कमी करण्याच्या उद्देशानं सशस्त्र दलांमध्ये अल्पकालीन सैनिकांच्या समावेशासाठी 'अग्नीवीर भरती योजना' सुरू केली होती. या योजनेंतर्गत, साडेसतरा ​​ते 21 वर्ष वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती केलं जातं, त्यापैकी 25 टक्के सेवा 15 वर्ष सुरू ठेवण्याची तरतूद आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

कुणी मला 'मौत का सौदागर' म्हटलं, कुणी 'गंदी नाली का कीडा', पण...; विरोधकांवर कडाडले पंतप्रधान मोदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Embed widget