Uday Samant: एकनाथ शिंदेंच्या को-ऑर्डिनेशन रूमवरून फडणवीसांमध्ये सुप्त संघर्ष? उदय सामंत स्पष्टच म्हणाले...
टायगर ऑपरेशन नाव आम्ही दिले नाही. ऑपरेशनची काहीच गरज नाही. खरी शिवसेना ही शिंदे यांचीच आहे. असेही ते म्हणाले.

Uday Samant: राज्यात एकीकडे राजन साळवी उद्धव सेनेला राम राम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर ऑपरेशन टायगरची (Operation Tiger) मोठी चर्चा झाली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर रूमच्या धरतीवर कोऑर्डिनेशन रूमची स्थापना झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या पुरस्कार सोहळ्याला शरद पवारांची उपस्थिती अशा तीनही घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा शिवसेनेभोवती आला आहे. स्नेहभोजनाला ठाकरे गटातील आमदारांच्या, खासदारांच्या उपस्थितीमुळे शिवसेनेतील नेत्यांचं नाराजी नाट्य सुरू असल्याचा समोर आलं. यावरून 'काल जेवणावरून वाद झाले आहेत. ऑपरेशन टायगर नाव आम्ही दिले नाही. जशी मुख्यमंत्री वरून केली जाते तशी उपमुख्यमंत्र्यांची वॉररूम आहे. तशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक को-ऑर्डिनेशन रूम आहे. यात स्पर्धा असण्यासारखे काही नाही.' असे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले. परभणी येथे आयोजित संजीवनी कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला तयार होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले उदय सामंत?
उपमुख्यमंत्र्यांच्या कॉर्डिनेशन रूमवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा सुरू आहे यावर उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, जशी मुख्यमंत्री वरून केली जाते तशी उपमुख्यमंत्र्यांची वॉररूम आहे. तशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक को-ऑर्डिनेशन रूम आहे. यात स्पर्धा असण्यासारखे काही नाही. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले आहे त्याचा विचार केला जाईल पण लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले. काल स्नेहभोजनावरून झालेल्या वादावर उदय सामंत म्हणाले, काल जेवणावरून वाद झाले आहेत. टायगर ऑपरेशन नाव आम्ही दिले नाही. ऑपरेशनची काहीच गरज नाही. खरी शिवसेना ही शिंदे यांचीच आहे. आता त्या शिवसेनेतील लोकांनाही ते कळले आहे. त्यामुळे लोक सोबत येतील. विधान परिषद महामंडळ कोणाला द्यायचे हे सगळे अधिकार शिंदे यांना आहेत. संजय जाधव यांच्या चिडण्यावर मी उत्तर देणार नाही. त्यांच्या ऑपरेशनमध्ये आहेत असे आम्ही म्हटलेले नाही. असं उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.
दुसरा अंक सुरु झाल्याची चर्चा
एकनाथ शिंदे यांच्या को-ऑर्डिनेशन रुमच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात वादाचा दुसरा अंक सुरु झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका वगळता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावलेल्या बहुतांश विभागाच्या बैठकांना दांडी मारली आहे. फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या अगदी स्वत:च्या विभागाच्या बैठकांनाही शिंदे हजर राहिले नव्हते. फडणवीस यांनी बोलावलेली 100 दिवसांची आढावा बैठक असो किंवा अलीकडे आयोजित करण्यात आलेली महापालिकांसंदर्भातील बैठक असो, एकनाथ शिंदे कोणत्याही बैठकांना हजर नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा रंगली होती.
हेही वाचा:























