Thane: गणेश नाईकांचा जनता दरबार म्हणजे दरबारी राजकारण , शिवसेनेच्या हेमंत पवारांची टीका,म्हणाले 'गडचिरोलीत भरवा दरबार '
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असताना पालघरच्या पालकमंत्र्यांनी ठाण्यात जनतेच्या समस्या सोडवण्याचं कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे . त्यावर गणेश नाईकांनी गडचिरोलीत जनता दरबार भरवावा असा टोला हेमंत पवार यांनी केली आहे.

Thane:शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज भाजप मंत्री गणेश नाईकांनी जनता दरबार भरवला .आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यासह पालघरमध्ये मोठी बानरबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं .यावरून आता शिवसेनेच्या हेमंत पवारांनी गणेश नाईकांवर निशाणा साधलाय .गणेश नाईक यांचा दरबार म्हणजे दरबारी राजकारण .त्यांनी गडचिरोली मध्ये जाऊन जनता दरबार भरवावा त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवावे असे म्हणतमाजी खासदार संजय नाईक यांना संधी मिळाली नाही .संदीप नाईकही निवडणुकीत पडले याचा राग मनामध्ये ठेवून हे सर्व उपद्याप सुरू आहेत अशी टीका शिवसेनेचे ठाणे विधानसभा शहरप्रमुख हेमंत पवार यांनी केली .
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असताना पालघरच्या पालकमंत्र्यांनी ठाण्यात जनतेच्या समस्या सोडवण्याचं कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे .आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर जनता दरबारावरून शिंदे गट आणि भाजपात शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत .
काय म्हणाले हेमंत पवार ?
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप वर्चस्व वाढवण्यासाठी जनता दरबार करत असल्याचं बोललं जातंय .दरम्यान ,शिंदे गटाचे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांनी गणेश नाईकांच्या जनता दरबारावर टीका केलीये .गणेश नाईकांचा दरबार म्हणजे दरबारी राजकारण .गणेश नाईकांनी त्यांचा जनता दरबार गडचिरोलीमध्ये भरवावा असं हेमंत पवार म्हणालेत .गणेश नाईक यांनी जो आज जनता दरबार भरवला आहे त्यावर माजी खासदार संजीव नाईक यांनी शिंदे साहेबांनी सुद्धा पालघरमध्ये जनता दरबार भरवावा असं सांगितलं . परंतु , नाईक कंपनी ही युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करत आहे . त्याचं कारण असं की , संजय नाईकांना उमेदवारी मिळाली नाही . संदीप नाईक निवडणुकीत पडले . त्याचा राग मनामध्ये ठेवून हे सर्व उपद्व्याप चाललेले आहेत .संजय केळकर निरंजन डावखरे प्रताप सरनाईक नरेश म्हस्के हे ठाण्यात जनतेची सेवा करण्यास सक्षम आहेत . महाराष्ट्राची जिम्मेदारी शिंदे साहेबांनी घेतलेलीच आहे . महाराष्ट्राच्या जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्पर असतात . गणेश नाईकांना माझं सांगणं आहे हे दरबारी राजकारण त्यांनी गडचिरोलीला जाऊन करावं. गडचिरोलीला जाऊन दरबार भरवावा . तिथल्या जनतेचे प्रश्न तिथं जनतेच्या गेल्या अनेक वर्षापासून तो भाग नक्षलग्रस्त आहे . तिथे जाऊन दरबार जर भरवला त्यांनी तर लोकांच्या समस्या सुटण्यासाठी अजून त्यांना मदत होईल आणि त्यांचं कार्याची पण तिकडे कौतुक केले जाईल . त्यामुळे त्यांनी गडचिरोली जाऊन हा दरबार भरवावा जेणेकरून त्यांचंही समाधान होईल .असं हेमंत पवार म्हणाले .
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
