एक्स्प्लोर

Harshwardhan Sapkal and Tipu Sultan: शिवरायांची टिपू सुलतानासोबत तुलना, भाजप आक्रमक होताच हर्षवर्धन सपकाळांनी सावरकरांचं 'ते' वक्तव्य बाहेर काढलं, म्हणाले...

Harshwardhan Sapkal and Tipu Sultan: हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे दोघे समकक्ष असल्याचे वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले होते.

Harshwardhan Sapkal and Tipu Sultan: टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal )यांनी केले होते. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान (Tipu Sultan) यांनी त्याच समकक्ष काम केलं आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समकक्ष मानले गेलं पाहिजे, असे मत त्यांनी मांडले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपने टीकेची झोड उठवली होती. यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला (BJP) त्यांच्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला वंदनीय असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्याचा दाखला देत भाजपला सवाल विचारला आहे. ते वर्धा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपला निवडणुकीत टिपू सुलतान चालतात. टिपू सुलतान यांचे छायाचित्र हे महानगर पालिका निवडणुकीत भाजपच्या घोषणापत्रात होते. माझा पुतळा जाळण्याऐवजी सावरकरांनी ' शिवाजी महाराज यायला... कावळा बसायला आणी डांग तुटायला.' असे जे वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने त्यांचे पुतळे भाजप जाळणार आहे का? महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवाजी महाराजांबाबत इतकं विकृत बोलले. त्यामुळे त्यांचेही पुतळे आपण जाळणार आहात का?, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला. 

देवेंद्रजी अमरावतीमध्ये आपल्या भाजपने एमआयएमचे मतदान घेतले. चंद्रपूर येथे एमआयएमच्या मदतीने आपण महापौर बसवला. महाराष्ट्रात 21 ठिकाणी आपण आघाडी करता, युती करता, मदत करता, तुमची युती आता लपून राहिलेली नाही. असे असताना काँग्रेससारख्या धर्म निरपेक्ष पक्षावर टीका करणं उचित नाही. महापुरुषांच्या फोटोवर भाजप जे आक्षेप घेत आहे. हा त्यांचा संविधान संपविण्याचा डाव आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

Harshvardhan Sapkal: हिंदू-मुस्लीम तेढ वाढवण्यासाठी भाजपकडून माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढून वापर केला जातोय: हर्षवर्धन सपकाळ


मुळात तथाकथित वाद जो निर्माण झाला आहे, माझ्या वक्तव्याच्या अनुषंगाने भाजप जी गरळ ओकते आहे. मसा शिवाजी महाराज आपल्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही. हे याठिकाणी विनम्रतेने आणी स्वाभिमानाने सांगू इच्छितो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची शान आहेत. त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या पराक्रमामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले आणि त्या स्वराज्याची प्रेरणा थेट स्वरूपामध्ये आपल्या संविधानापर्यंत आहे. काल पत्रकारांनी प्रश्न विचारत असताना विचारले की, महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणी टिपू सुलतान यांचे छायाचित्र कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. याकडे आपण कसे बघता त्याच्या उत्तरादाखल माझं जे उत्तर होतं. ते हे होतं की, शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला. त्याचाच आदर्श हा टिपू सुलतान यांनी घेतला. टिपू सुलतान हे शिवरायांचा आदर्श घेऊन इंग्रजाशी ते लढले. त्या अनुषंगाने माझे वक्तव्य आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले. 

मला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला दाबून कुठेतरी हे वक्तव्य चालविण्यात येत आहे.  हा भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे. देवेंद्र फडणवीस यांची तुलना मी औरंगजेबाशी केली. तेव्हा ते म्हणाले मी त्यांना ओळखत नाही. मी त्यांना जल्लाद म्हटले, मी त्यांना क्रूर असण्याच्या अनुषंगाने 'दरींदा' म्हटले. त्यावेळेसही त्यांनी मला ओळख दाखविली नाही. काल, मात्र आवेशात येऊन जे काही त्यांनी माझ्याबदल गरळ ओकली. याचा स्पष्ट अर्थ आहे की महाराष्ट्रत जे मूलभूत मुद्दे आहे आणि दिल्ली स्तरावर ज्या फाईलमध्ये बरंच काही लपलेलं आहे. त्यापासून त्यांना इतरत्र लक्ष वेधण्याचे आहे. प्रत्येक बाबतीत जात आणणे, प्रत्येक बाबतीत धर्म आणणे, भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंड आहे. माझ्या वक्तव्याचाही त्याच धोरणाप्रमाणे विपर्यास करुन हिंदू-मुस्लिम तेढ वाढवण्यासाठी भाजप या सगळ्याला खतपाणी घालत आहे. भाजप हा माफीवीरांचा पक्ष आहबे, त्यामुळेच त्यांनी माफीचा आग्रह धरला आहे. शिवाजी महाराजांचा जो स्वाभिमान आणि आमचा अभिमान आहे तो मी त्यातही अधोरेखित केला होता. टिपू सुलतान यांच्या अनुषंगाने महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो भाजपने आपल्या घोषणापत्रात वापरले होते, असा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता.

आणखी वाचा

टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget