(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gulabrao Patil : बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं, सायकल चोरणाराही तेव्हा मुख्यमंत्री झाला, गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र
"बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं..कोणी टपरिवाला कोणी रिक्षावाला...सायकल चोरणारा तेव्हा मुख्यमंत्री झाला, मतलब के लिये कोई अपना बाप बदल लेता है"
Gulabrao Patil : बाळासाहेबांनी (balasaheb thackeray) अनेकांना मोठं केलं..कोणी टपरिवाला कोणी रिक्षावाला...सायकल चोरणारा तेव्हा मुख्यमंत्री झाला, मतलब के लिये कोई अपना बाप बदल लेता है असे वक्तव्य करत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी नारायण राणेंवर (narayan rane) नाव न घेता टीका केलीय. नेवासा तालुक्यातील सोनई येथे शिवसंवाद मेळावा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटलांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना याबाबत अनेक आठवणी ताज्या केल्या.
बाळासाहेब नसते तर....
बाळासाहेब नसते तर माझ्या सारखा माणूस आमदार सोडा.. सरपंच ही झाला नसता..25 वर्षांचा असताना मी शिवसेना जिल्हा प्रमुख झालो..मारिपीटी हा आपला धंदा होता त्यावेळी...92 च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ अनेक महिने जेल मध्ये होतो..अश्या परिस्थितीत शिवसेना उभी राहिली...आता फक्त कार्डापुरते आहेत काही लोक सेनेत. तुम्ही सेनेकडे मागतात मात्र तुम्ही संघटनेला काय दिले हे ही बघा ना? 30 वर्षाचा असताना आमदार झालो. त्यावेळी गुलाबरावांनी विधानसभेतील किस्सा त्यांनी सांगितलाय.
आजची शिवसेना व पूर्वीची सेना यात फरक
आजची शिवसेना व पूर्वीची सेना यात फरक पडलाय. पूर्वीच्या काळी आम्ही सत्तेसाठी शिवसेनेबरोबर आलो नाही. त्याकाळी पोलीस आमच्या पाचवीला पुजलेला होता.. त्यांचं आमचं जणू काही लव्ह मॅरेजच होत..त्यावेळी काँग्रेसची एक हाती सत्ता होती.. सेनेच्या शाखेचा बोर्ड लागला की लगेच नोटीस यायची. असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणा दरम्यान केले. शिवसेना त्यागातून उभी राहिलीय..अनेक लोक सोडून गेले मात्र शिवसेना अजूनही भक्कम आहे..भुजबळ गेले तेव्हा पहिला धक्का होता..नारायण राणे गेले नेपोलियन तरी शिवसेना उभीच आहे..त्यानंतर राज साहेब गेले तरी शिवसेना उभीच आहे...शिवसेना हा पक्ष नव्हे तर एक विचार...शिवसेना संपली तर पहिल नुकसान शिवसैनिकांच..आमचं नंतर कारण आम्हाला तर आता पेन्शन लागू झालीय..असे गुलाबरावांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या