Gulabrao Patil on Raj Thackeray and Uddhav Thackeray: मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंच्या युतीचं आव्हान असेल का? गुलाबराव पाटलांनी दोन वाक्यात विषय उरकला
Gulabrao Patil on Raj Thackeray and Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलंय.

Gulabrao Patil on Raj Thackeray and Uddhav Thackeray: मुंबईसह राज्यातील एकूण 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयार केली जात आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC Election 2026) निवडणुकीत मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची युती होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. जर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र निवडणुकीत उतरले तर महायुतीसाठी (Mahayuti) कडवे आव्हान निर्माण होणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाष्य केलंय.
Gulabrao Patil on Raj Thackeray and Uddhav Thackeray: गुलाबराव पाटलांनी दोन वाक्यात विषय उरकला
मंत्री गुलाबराव पाटील यांना मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंच्या युतीचा आव्हान असेल का? असे विचारले असता ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजपची युती होऊन जागा वाटप कसे होते. त्यानंतर पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र राहिले तर मला वाटतं आम्ही त्या ठिकाणी मजबुतीने निवडून येऊ, असे प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Gulabrao Patil : जळगाव जिल्ह्यातील निवडणुकीबाबत गुलाबराव पाटलांचा भाष्य
दरम्यान, आम्ही आमच्या परीने निवडणुकीमध्ये प्रयत्न केले, पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. संघटन असल्याने आम्हाला यश मिळेल, असा विश्वास राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या निकालाबाबत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा, भडगाव, धरणगाव, चोपडा मुक्ताईनगर, आणि नशिराबाद या ठिकाणी आम्हाला यश मिळेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)
- नामनिर्देशन - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- नामनिर्देशन पत्राची छाननी - 31 डिसेंबर
- उमेदवार मागे घेणे - 2 जानेवारी 2026 पर्यंत
- अंतिम यादी आणि चिन्ह - 3 जानेवारी 2026
- मतदान - 15 जानेवारी 2026
- मतमोजणी / निकाल-16 जानेवारी 2026
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या























