पालक दिलं तर पालक..मालक ठरवतील, गुलाबराव पाटील खातेवाटपावर म्हणाले, 'अडूनच बसायचं असतं तर..'
Gulabrao Patil: कल्याण मध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झालेल्या प्रकरणावरही गुलाबराव पाटील यांनी कडाडून टीका केली.
Maharashytra Cabinet: राज्यात महायुतीचा शपथविधी सोहळा रविवारी 15 डिसेंबरला पार पडला. आता एका आठवड्यानंतर मंत्रिमंडळाच्या शपथविधीला एक आठवडा उलटला तरी अद्याप खातेवाटप झाला नसल्यानं कोणाला कोणतं पद मिळणार याकडे लक्ष आहे. दरम्यान,मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे पहिल्यांदा आपल्या मतदारसंघात परतले आहेत. त्यांना कुठले खाते मिळेल?, पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल का? यावर पालक दिलं तर पालक..मालक ठरवतील अशी प्रतिक्रीया गुलाबराव पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. मुंबई मराठी माणसाला झालेली मारहाण, नवीन वर्षाचा त्यांचा संकल्प काय आहे, यासह इतर मुद्द्यांवर गुलाबराव पाटील बोलले.
'जे खात मिळेल त्यात काम करणार असल्याचे सांगत कुठलं खातं मिळेल याबद्दल काहीच माहित नाही, वरून जे ठरवतील ते मान्य असेल. पालक दिलं तर पालक..मालक ठरवतील असा गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान कल्याण मध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झालेल्या प्रकरणावरही गुलाबराव पाटील यांनी कडाडून टीका केली. इथे राहायचं इथे खायचं पैसे कमवायचे, जी मुंबई तुम्हाला कुशीत घेते तिथे राहून मराठी माणसालाच वाईट म्हणायचं हे खपवून घेतलं जाणार नाही. अशांना चोपला पाहिजे, ठोकला पाहिजे. इथे राहून मराठी माणसांना घाणघाण बोलताय .चालते व्हा तुमच्या राज्यात .'असं गुलाबराव पाटील म्हणाले .
खाते वाटपावर गुलाबराव म्हणाले ..
मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटप कधी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले असून हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आजच खातेवाटप होणार असल्याची चर्चा आहे . सगळीच खाती आवडतात .असेही ते म्हणाले .उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी अडून बसल्याची चर्चा असून गृहखात्यासाठी मागणी केली आहे .मागणी करणं चुकीचं नाही .त्यामुळे जर कोणी म्हणत असेल गृहखातासाठी अडून बसले, अडूनच बसायचं असलं असतं तर सरकारच स्थापन झाला नसतं .खातं कुठलंही मिळालं तरी मान्य असेल .जेही खात मला मिळेल ते काम मी करेन .पालकमंत्री पद मिळेल का ? विचारल्यावर कोणता पद मिळेल याविषयी माहिती नाही . वरती जे ठरेल ते चालेल . पालक दिलं तर पालक .मालक ठरवतील अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली .
हेही वाचा: