Gujarat Election 2022: गुजरामध्ये सरकार आल्यावर मोरबीत नवीन पूल बांधणार: अरविंद केजरीवाल
Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आपल्या संपूर्ण ताकदसह उतरला आहे. गुजरातमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ही भाजपला टक्कर देताना दिसत होती. मात्र आता भाजपसमोर काँग्रेससह आम आदमी पक्षाचेही आव्हान आहे.
Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आपल्या संपूर्ण ताकदसह उतरला आहे. गुजरातमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ही भाजपला टक्कर देताना दिसत होती. मात्र आता भाजपसमोर काँग्रेससह आम आदमी पक्षाचेही आव्हान आहे. अशातच दिल्लेचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केरीवाल यांनी मोरबी केबल पुलाची दुरुस्ती करणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. गुजरातमध्ये आपचे सरकार आल्यास मोरबीमध्ये मोठा पूल बांधून देऊ, असेही ते म्हणाले आहेत.
गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील वांकानेर येथे तिरंगा यात्रेदरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'डबल इंजिन' भाजपला पुन्हा जनादेश मिळाल्यास भविष्यातही मोरबी पूल दुर्घटनेसारखे अपघात घडतील. मोरबीमध्ये जे घडले ते अतिशय दुःखद आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 55 लहान मुलांचा समावेश आहे. ते तुमचीही मुले असू शकले असते. जे घडले ते खूप दुःखद आहे, पण त्याहूनही दु:खद बाब म्हणजे या अपघाताला जबाबदार असलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
केजरीवाल म्हणाले की, गुजरातमध्ये परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. भाजपवर टीका करताना ते म्हणाले, "आम्हाला नवीन इंजिन सरकार हवे आहे, डबल इंजिन नाही. डबल इंजिन गंजले आहे, ते जुने आणि खराब झाले आहे. डबल इंजिन आणल्यास मोरबी पूल कोसळेल. जर तुम्ही नवीन इंजिन आणले तर आम्ही मोरबी येथे एक मोठा पूल बांधू."
अरविंद केजरीवाल म्हणाले की, ''त्यांना खोटं (भाजपला) बोलण्याची सवय नाही. आपने गुजरातमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार इत्यादी संदर्भात जी आश्वासने दिली आहेत, ती सर्व दिल्लीतील माझ्या सरकारवर आधारित आहेत.'' ते म्हणाले की, मी एक सुशिक्षित व्यक्ती आहे. मला काम कसे करायचे, शाळा आणि रुग्णालये कशी बांधायची हे माहित आहे. मी खोटी आश्वासने देत नाही. मी तुम्हाला 15 लाख रुपये देण्याचे वचन कधीच देणार नाही. मी खोटे बोलत नाही. मी फक्त दिल्लीत केलेल्या कामाबद्दल बोलत आहे. मी एक प्रामाणिक माणूस आहे, मी भ्रष्टाचार करत नाही, असं केजरीवाल म्हणाले आहेत.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांनी गुजरातसाठी एक योजना तयार केली आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने रुग्णालये, मोहल्ला दवाखाने बांधणे आणि तरुणांना रोजगार देणे समाविष्ट आहे. ते म्हणाले, "तुम्ही भाजपला 27 वर्षे दिली आहेत. मी तुम्हाला इथे फक्त पाच वर्षे मागत आहे. आम्हाला पाच वर्षे द्या, मी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत तर मी तुमच्याकडे मते मागायला येणार नाही.''