एक्स्प्लोर

Manoj Jarange: 'सरकारने मराठा आरक्षणाबाबत सरकारने आमची आशा संपवली', निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगेंनी व्यक्त केला संताप

Manoj Jarange: आता रणशिंग फुंकले आहे, लढाईला उतरायचं म्हणजे तलवार काढावी लागेल, घोडा मैदान जिंकायचं आहे, सरकारने मराठा आरक्षणाबाबत सरकारने आमची आशा संपवली आहे, असंही मनोज जरांगे यांनी आज म्हटलं आहे.

Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मनोज जरांगे यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच आपला रोष व्यक्त केला. त्यांनी राज्य सरकारला अनेकदा अल्टीमेटम देऊन देखील त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, त्यानंतर आता मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला आहे. आता या निवडणुकीमध्ये निर्णायक मतदान हे मराठ्यांच आहे, आता रणशिंग फुंकले आहे, लढाईला उतरायचं म्हणजे तलवार काढावी लागेल, घोडा मैदान जिंकायचं आहे, सरकारने मराठा आरक्षणाबाबत सरकारने आमची आशा संपवली आहे, असंही मनोज जरांगे यांनी आज म्हटलं आहे. 

मराठ्यांची दखल घेण्याऐवजी त्यांना बेदखल करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य बेचिराख करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. आमची आयुष्य उध्दवस्त करण्याचं काम सरकारने केलं आहे, ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेत बसवलं त्यांना बेचिराख करण्याचं काम केलं आहे. यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सत्तेचा वापर केला. अशा गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर या बांधवांना जी अपेक्षा होती, सरकार आपल्या लेकरांना शंभर टक्के आरक्षण देईल, मराठ्यांच्या लेकरांचे मुडदे पाडून पापाचा वाटेकरी हे सरकार कधीच होणार नाही. ही आशा होती, ती आशी सरकारने संपवली आहे. 

शेवटी सामाजिक चळवळीत आणि या क्षेत्रात काम करताना मतभेट असणं योग्य आहे, मात्र, हा समाज एकत्र ठेवायचा नाही, त्यांना मोठं होऊ द्यायचं नाही, मराठ्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहिली पाहिजेत. नोकऱ्यापांसून शिक्षणापर्यंत मराठ्यांची मुलं भिकारी झाले पाहिजेत. हे वचन देवेंद्र फडणवीसांनी घेतलं होतं, सत्ता मात्र, मराठ्यांनी दिली मात्र, त्या सत्तेच्या जोरावर मराठ्यांची मुलं भिकारी झाली पाहिजे, या तत्वाने, द्वेषाने आणि आकसाने ते वागले आहेत. त्या पध्दतीने त्यांची ती चाल यशस्वी केली, निर्णय घेणं त्यांच्या हातात होतं, त्यांनी निर्णय घेतला नाही ओबीसीच्या १७ जाती घेतल्या पण मराठ्यांना आरक्षण दिलं नाही असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. 

मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही हेच फडणवीसांचे प्रयत्न

देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही यासाठीच फडणवीसांनी सुरुवातीपासून खेळी केली. या मराठ्यांची पोरं आरक्षणासापासून, शिक्षणापासून, नोकरीपासून वंचित राहीले पाहिजेत अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस मराठ्यांसोबत वागले. सामाजिक चळवळीत वैचारिक मतभेद असू शकतात पण मराठा समाज एक ठेवायचा नाही, मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचं काम फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीस द्वेषाने वागले. मराठ्यांच्या शेपटावर त्यांनी पाय ठेवला. 

मराठ्यांना सोडून हे सत्तेत येणार नाहीत, 100 टक्के मतदान करा 

मराठ्यांना फडणवीस यांची खुन्नस कळाली होती. आम्ही मराठ्यांना बाजूला ठेऊन सत्तेवर बसू असं देवेंद्र फडणवीसांनी ठरवलंय. देवेंद्र फडणवीस आम्हाला आरक्षण देतील असा आम्ही विश्वास ठेवला होता. शेवटी त्यांनी बरबटलेले विचार त्यांनी बाहेर आणलेच. मराठ्यांना बाजूला ठेवण्यासाठी फडणवीस यांनी डाव रचले. त्यांच्या 17 पिढ्या आल्या तरी मराठ्यांना बाजूला ठेऊन ते सत्तेवर कधीच येऊ शकत नाही. इथे सर्व जातींचा प्रश्न आहे. हात जोडून सर्व समाजाला विनंती करतो, आपल्या समाजाला बळ द्यायचं काम करा. यावेळी मराठ्यांचे 100 टक्के मतदान झाले पाहिजे. मराठ्यांचे एकही मतदान घरी राहता कामा नये.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तरZero Hour : महायुतीच्या आधीच अजित दादांच्या राष्ट्रवादीचा स्वतंत्र जाहीरनामाZero Hour:डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष ते महायुतीच्या आधी दादांचा जाहीरनामा;झीरो अवरमध्ये चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget