Pankaja Munde on Gopinath Munde : साहेबांनी मला हेलिकॉप्टर बूक करायला सांगितलं होतं, पण 3 जूनची सकाळ उजाडली अन्... पंकजा मुंडेंनी सांगितला तो प्रसंग
Pankaja Munde on Gopinath Munde, Beed : "एक मुलगा पण आपल्या पित्याचे जेवढे विधी करत नाही, त्यापेक्षाही जास्त विधी मी केले. साहेब तुम्ही आणखी पाच वर्ष तरी जगायला पाहिजे होतं. साहेब 3 जूनला परळीला येणार होते. परळीमध्ये सजावट करण्यात आली होती.
Pankaja Munde on Gopinath Munde, Beed : "एक मुलगा पण आपल्या पित्याचे जेवढे विधी करत नाही, त्यापेक्षाही जास्त विधी मी केले. साहेब तुम्ही आणखी पाच वर्ष तरी जगायला पाहिजे होतं. साहेब 3 जूनला परळीला येणार होते. परळीमध्ये सजावट करण्यात आली होती. साहेबांनी मला हेलिकॉप्टर बुक करायला सांगितलं होतं. तीन जूनला सकाळी फोन आला आणि सगळं होत्याच नव्हतं झालं", भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनापूर्वी काय घडलं? हा संपूर्ण प्रसंग पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाषणातून सांगितला. पंकजा मुंडे यांच्या हस्ते जाटवड (मानूर) येथे गोपीनाथ गडाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
लग्नपत्रिका लोक साहेबांच्या समाधीवर ठेवतात
पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, मी गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही, अशी शपथ मी पित्याला अग्नी देताना घेतली होती. वटसावित्री पौर्णिमेला साहेबांच्या स्मारकावर पुरणपोळी ठेवली होती. लग्नपत्रिका लोक साहेबांच्या समाधीवर ठेवतात म्हणूनच मी गोपीनाथ गड उभा केला.
साहेबांसमोर लढणारा माणूस काय साधा होता का?
पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुढे बोलताना म्हणाल्या, मला काम करणारे माणसं पाहिजेत. मी एकेक माणसं गोळा केली. मुंडे साहेबांसमोर लढणारा माणूस काय साधा होता का? म्हणून मी सुरेश धसांना घेतलं. मी 2004 ला राजकारणात आले. संघर्ष करत नेता बनले. मी कुणाचा कधी चहा पिला नाही, लोकांसाठी काम करत गेले. जास्त गोड खाल्ल्यावर शुगर होत असते.या लोकांचे प्रेम इतकी गोड आहे की मला प्रेमाचे शुगर झाल्याशिवाय राहणार नाही, असेही पंकजा (Pankaja Munde) म्हणाल्या.
मी उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही
संघर्ष कन्या,रणरागिणी, किती मोठी भूषण तुम्ही मला दिली आहेत. मी कधीच कुणाला शत्रू मानत नाही.कोणतीही निवडणूक आली की माझं नाव येतं. तुम्ही मला साथ देणार का ? असा सवालही पंकजा मुंडे यांनी उपस्थित लोकांना केला. मी रानामध्ये उतरल्यावर तुम्हालाही रानामध्ये उतरावं लागेल. मी थकणार नाही मी झुकणार नाही मी कुणासमोर कधीच झुकणार नाही. मी उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही, असंही पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नमूद केलं.
इतर महत्वाच्या बातम्या